शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

‘सुप्रिया’ ने आत्महत्या का केली...?

By admin | Updated: December 29, 2014 23:45 IST

दरम्यान, सुप्रियाच्या आत्महत्येचे कारण शोधण्यासाठी पोलिसांनी आज दिवसभर वसतिगृहातील मुलींकडे कसून चौकशी केली

आई-वडिलांना वेदना : कारण शोधण्याची पोलिसांना विनंती कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृह क्रमांक-तीनमध्ये काल, रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या सुप्रिया कृष्णा पाटील (वय २४, रा. रिळे-बत्तीस शिराळा, जि. सांगली) हिच्या आत्महत्येपाठीमागचे कारण शोधा, अशी भावनिक विनंती तिच्या आई-वडिलांनी पोलिसांना केली आहे. त्यानुसार नातेवाइकांसह वसतिगृहातील विद्यार्थिनींकडे पोलिसांनी आज, सोमवारी दिवसभर चौकशी केली. तिच्या मोबाईलमध्ये सीमकार्ड नसल्याने ती कोणत्या कंपनीचे सीमकार्ड वापरत होती, त्याची माहिती घेऊन त्यावरील कॉल डिटेल्स तपासण्यात येणार आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांनी दिली. सुप्रियाने लिहिलेल्या नोटबुकमध्ये काही प्रेमाचे संदेश आढळून आल्याने प्रेमप्रकरणातून तिने हे कृत्य केले आहे का,या दृष्टीनेही पोलीस तपास करीत आहेत. काल रात्री तिचे आई-वडील व नातेवाईक सीपीआरमध्ये आले. काही नातेवाइकांनी तिच्या वसतिगृहातील खोलीमध्ये येऊन पाहणी केली. मुलीचा मृतदेह पाहून आई-वडिलांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. सर्वकाही चांगले असताना तिने आत्महत्या का केली, याची चौकशी करा, अशी भावनिक विनंती तिच्या आई-वडिलांनी पोलीस निरीक्षक देशमुख यांच्याकडे केली. शोकाकुल नातेवाइकांना अखेर पोलिसांनी सावरले. त्यानंतर शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह ताब्यात घेऊन गावी नेण्यात आला. त्याठिकाणी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.  दरम्यान, सुप्रियाच्या आत्महत्येचे कारण शोधण्यासाठी पोलिसांनी आज दिवसभर वसतिगृहातील मुलींकडे कसून चौकशी केली. तिच्या जवळच्या मैत्रिणींनाही विश्वासात घेऊन कारण शोधण्याचा प्रयत्न केला. तिचा कोणी मित्र होता का? ती कोणाला भेटत होती? तिला फोन कोणाचे यायचे? तुम्हाला ती स्वत:बद्दल काही सांगत होती का? आदी प्रश्नांतून माहिती मिळविण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. यावेळी चौकशीसाठी बोलाविलेल्या मुली बिथरून गेल्या होत्या. (प्रतिनिधी) रात्रभर मुली उपाशीसुप्रियाने दिवसा वसतिगृहातील खोलीमध्ये आत्महत्या केल्याने अन्य मुलींत भीतीचे वातावरण पसरले होते. जेवण न करता तिच्या आठवणीने वसतिगृहातील मुलींनी रात्र जागून काढली. शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासात वसतिगृहातील आत्महत्येची ही पहिलीच घटना आहे.