शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना अच्छे दिन आले का ?

By admin | Updated: February 16, 2017 00:46 IST

राजू शेट्टी यांची भाजपवर टीका : नवे पारगाव येथे स्वाभिमानीची प्रचार सभा

नवे पारगाव : भाजपने शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन आणणार असल्याचे स्वप्न दाखविले, पण हे अच्छे दिन आले का? असा सवाल उपस्थित करत शेतकऱ्यांनी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांला आता संधी द्यावी, असे आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी केले. जुने पारगाव (ता. हातकणंगले) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या घुणकी जि. प. मतदारसंघाच्या उमेदवार स्वाती कांबळे यांच्या प्रचार प्रारंभप्रसंगी खासदार राजू शेट्टी बोलत होते. अध्यक्षस्थानी सदाशिव बोने पाटील होते. स्वाभिमानीच्या घुणकी जि. प. मतदारसंघाच्या उमेदवार स्वाती कांबळे यांच्या प्रचाराचा प्रारंभ किणी येथे हनुमान मंदिरात झाला. त्यानंतर घुणकी, चावरे, तळसंदे, पारगाव येथील ग्रामदैवताच्या ठिकाणी खासदार राजू शेट्टी यांच्यासह कार्यकर्ते मोटारसायकलवरून रॅलीने गेले. जुने पारगाव येथे या रॅलीची प्रचार सभेने सांगता झाली. खा. शेट्टी म्हणाले, भाजपने अच्छे दिनाचे स्वप्न दाखविले, पण ते फोल ठरविले. शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेत संघटनेच्या कार्यकर्त्यांला पाठवावे आणि विकास साधावा, असेही आवाहन केले. स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब एडके, जिल्हा नियोजनचे सदस्य शिवाजी माने, वैभव कांबळे यांनी स्वाती कांबळेंना विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी सुरेश पाटील, हणमंत हवालदार, आण्णा मगदूम, शिवाजी शिंदे, सुधीर मगदूम, दीपक सनदे, सुनील पचिंबरे, हरिभाऊ जाधव, सूर्यकांत पाटील, किरण पाटील, दत्ता भांबुरे, मानसिंग मोहिते, विकास मोहिते उपस्थित होते. विभाग प्रमुख संपत पोवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शिवाजी आंबेकर यांनी आभार मानले. (वार्ताहर)