कोल्हापूर : कै. वाय. बी. पाटील रौप्यमहोत्सवी क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात डायमंड स्पोर्टस्, डिग्रजने जी. के. स्पोर्टस्, कळंबा संघावर चार गडी राखून विजेतेपद पटकाविले. विजेत्या संघास खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. याप्रसंगी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील उपस्थित होते. विजेत्या संघास फिरता चषक व रोख ५१ हजार रुपये देऊन गौरविण्यात आले, तर उपविजेत्या संघास २५ हजार रुपये व चषक देण्यात आला. डायमंड स्पोर्टस्च्या अमोल भोजणे यास ‘मॅन आॅफ दि मॅच’, तर जी. के. स्पोर्टस् कळंब्याच्या गजानन गुरव यास ‘मॅन आॅफ दि सिरीज’च्या पुरस्काराने गौरविण्यात आले. अंतिम सामना जी. के. स्पोर्टस्, कळंबा विरुद्ध डायमंड स्पोर्टस्, डिग्रज यांच्यामध्ये झाला. प्रथम फलंदाजी करताना जी. के. स्पोर्टस्ने ८ षटकांत ६ बाद ६९ धावा केल्या. उत्तरादाखल खेळताना डायमंड स्पोर्टस्ने ६ गडी गमावून हे लक्ष्य पूर्ण केले. त्यामध्ये अमोल भोजणेने १० चेंडूंत २० धावा केल्या, तर अविनाश दबडेने १६ चेंडंूत २२ धावा केल्या. बक्षीस वितरणप्रसंगी ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, नगरसेवक प्रदीप उलपे, माजी नगरसेवक सुभाष बुचडे, अर्जुन चौगले, प्राचार्य महादेव नरके उपस्थित होते.
डायमंड स्पोर्टस् अजिंक्य
By admin | Updated: December 29, 2014 00:21 IST