शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

हिरण्यकेशीचे पात्र कोरडे

By admin | Updated: January 30, 2017 23:49 IST

शेतकरी चिंतेत : पाटबंधारे विभागाने खणदाळ बंधाऱ्याच्या पुढे पाणी सोडावे

हलकर्णी : नांगनूर, खणदाळ, अरळगुंडी, कडलगे दरम्यान हिरण्यकेशी नदीचे पात्र कोरडे पडले आहे. परिणामी. परिसरातील पिके वाळून जाण्याच्या भीतीने शेतकरी त्रस्त झाला आहे. पाटबंधारे विभागाने खणदाळ बंधाऱ्याच्या पुढे नांगनूर, अरळगुंडी, कडलगेपर्यंत पाणी सोडावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.यंदा चित्री प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. शिवाय यंदाचे वर्ष जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींचा रेटा पाटबंधारे विभागाला लागेल आणि मे अखेर लाभक्षेत्राबाहेरील गावांनाही पाणीपुरवठा होईल. या आशेवर शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, शाळू, भाजीपाला, आदी पिके घेतली. मात्र, सध्या पाण्याअभावी ही सर्व पिके वाळून जाण्याची भीती निर्माण झाली आहे.निवडणूक घोषित होण्यापूर्वी नांगनूर येथे झालेली हत्तरकी गटाची पाणी परिषद, लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा यामुळे महिन्यापूर्वी हिरण्यकेशी पात्रात कडलगेपर्यंत पाणी सोडले होते. मात्र, महाराष्ट्र, कर्नाटक हद्दीतील वाढलेले बागायती क्षेत्र, वाढता पाणी उपसा यांमुळे महिन्यातच नदीपात्र पुन्हा कोरडे पडले आहे. हत्तरकी गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रांताधिकाऱ्यांना नदीत पाणी सोडण्यासाठी निवेदन दिले आहे. मात्र, प्रशासनाने अद्याप त्याची दखल घेतली नाही.चालूवर्षी परिसरात ऊस उत्पादनात प्रचंड घट आली होती. त्यामुळे चार पैसे मिळविण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, शाळू या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केली होती. सध्या ही सर्व पिके भरणीच्या अवस्थेत आहेत. शिवाय ऊसपिकाला सुद्धा पाण्याची आवश्यकता आहे. वेळेत पाणी उपलब्ध झाले नाही, तर या सर्व पिकांच्या उत्पादनात घट होणार आहे.पाटबंधारे विभागाने ताबडतोब पाणी सोडले नाही, तर नांगनूर, अरळगुंडी, कडलगे येथील तरुण शेतकरी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांवर बहिष्कार घालण्याची चर्चा करताना दिसत आहेत. पिके वाळून जाण्यापूर्वी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करून पाटबंधारे विभागास पाणी सोडण्यास भाग पाडावे, अशी या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची मागणी आहे. (वार्ताहर)