शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

चेतना, स्वयंम, जिज्ञासाची स्वावलंबनातून तेजोमय दिवाळी

By admin | Updated: November 5, 2015 00:25 IST

अपंगत्वावर मात : संस्थांमधील मुलांनी बनविले आकाशकंदील, पणत्या, पूजेचे साहित्य

कोल्हापूर : निसर्गाने आपल्याला दिलेल्या शारीरिक, बौद्धिक अपंगत्वावर मात करून स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारलेल्या चेतना, स्वयंम, जिज्ञासा या संस्थांमधील विद्यार्थ्यांनी आकाशकंदील, आकर्षक दिवे, दिवाळीत लक्ष्मी पूजनासाठी लागणारे साहित्य, भेटवस्तूंचे बॉक्स बनविले आहेत. त्यांच्या या धडपडीला आणि प्रयत्नांना साथ देण्यासाठी समाजातून मदतीचे हात पुढे यायला हवेत. मतिमंदत्व आणि अपंगत्व आलेल्या व्यक्तींना याावर मात करीत जगण्याची कला आणि स्वयंनिर्भरतेचे धडे देणाऱ्या चेतना, जिज्ञासा आणि स्वयंम या संस्थांनी नवी दिशा दिली आहे. या विद्यार्थ्यांच्या हाताला काम देताना त्यातील आपुलकी जपत संस्थेच्यावतीने दरवर्षी दिवाळीत आकर्षक आकाशकंदील, पणत्या, दिवे बनविले जातात. दिवाळीच्या अभ्यंगस्नानासाठी लागणारे साबण, उटणे, तेल या साहित्यांचा बॉक्स बनविला जातो. तसेच लक्ष्मी पूजन साहित्यांचीही विक्री केली जाते. या साहित्यांची किंमतही वाजवी असते. (प्रतिनिधी) आम्ही संस्थेत दरवर्षी ४० हजार पणत्या, ५००० दिवाळी स्पेशल गिप्ट बॉक्स, तीन हजार किलोचे उटणे, लक्ष्मी पूजन साहित्याचे पुडे ३०००, एक हजार डझन आकाशकंदील बनवतो. अखेरच्या काही दिवसांत जास्त वेळ बसून काम पूर्ण करावे लागते. या पैशांतून विद्यार्थ्यांसह संस्थेचा खर्च भागविला जातो. - कृष्णात चौगले (कार्यशाळा प्रमुख, चेतना संस्था )आमच्या संस्थेत जून महिन्यापासूनच दिवाळीचे साहित्य बनवायला सुरुवात होते. आकाशकंदील, दिवाळी गिप्ट बॉक्स, पणत्या बनविल्या जातात. उटणे संस्थेतच बनविले जाते. विद्यार्थ्यांच्या कलात्मकतेलाही वाव मिळतो. - स्मिता दीक्षित(संस्थापक, जिज्ञासा)