शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

दलित वस्तीच्या निधीवरून धुसफूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:20 IST

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या दलित वस्तीच्या निधीवरून पुन्हा एकदा धुसफूस सुरू झाली आहे. हा निधी वाटपाचा अधिकार ...

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या दलित वस्तीच्या निधीवरून पुन्हा एकदा धुसफूस सुरू झाली आहे. हा निधी वाटपाचा अधिकार दोन्ही मंत्र्यांनी त्यांच्याकडे घेतल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत समाजकल्याण समितीच्या सदस्यांची मंगळवारी बैठक झाली. येत्या दोन दिवसात याबाबत लेखी तक्रार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दलित वस्ती विकासासाठी ३६ कोटींचा निधी जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाला आहे. आधीच पंधराव्या वित्त आयोगाच्या निधी वाटपामध्ये न्यायालयात याचिका दाखल केली गेल्याने महाविकास आघाडीचे नेते ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील हे नाराज झाले आहेत. त्यात दलित वस्तीच्या निधीवरूनही साठमारी सुरू झाल्याने यामध्ये मंत्र्यांनी लक्ष घालण्याचा निर्णय घेतला.

जिल्हा नियोजन समितीकडून हा निधी उपलब्ध होत असल्याने पालकमंत्री सतेज पाटील यांनी या निधी वाटपाची माहिती घेतल्याचे समजते. यावरून सदस्यांचा गैरसमज झाल्याने यामध्ये मंत्री हस्तक्षेप करत असल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे. याबाबत मंगळवारी सदस्यांच्या झालेल्या बैठकीत जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे यांच्याबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली.

घाटे यांनी पालकमंत्र्यांना ही सगळी माहिती देण्याची गरज आहे का? असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे. मात्र पालकमंत्र्यांनी बोलावल्यानंतर त्यांना आवश्यक असणारी माहिती देणे अधिकाऱ्यांना बंधनकारक असल्याने अधिकाऱ्यांचीही कोंडी झाली आहे.

चौकट

तत्कालीन पालकमंत्र्यांविरोधात झाले होते बंड

तीन वर्षांपूर्वी तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी समाजकल्याण विभागाच्या निधी वाटपातील घोळ संपवण्यासाठी आपल्या अधिकाऱ्यांना लक्ष घालण्यास सांगितले होते. त्यावेळी भाजपच्या सदस्यांसह सर्वच समाजकल्याण समितीच्या सदस्यांनी त्यांच्याविरोधातही जाहीर भूमिका घेतली होती. असाच प्रसंग आताही निर्माण झाला आहे. परंतु नेत्यांसमोर उघड बोलणे टाळून अधिकाऱ्यांनाच लक्ष्य केले जाईल, अशी सध्याची परिस्थिती आहे.