शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मंदिर जीर्णाेद्धाराच्या पैशांवरून धुमश्चक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2015 01:02 IST

वारूंजीत तिघे जखमी : परस्परविरोधी फिर्यादींवरून माजी सरपंचांसह तेराजणांवर गुन्हा

कऱ्हाड : मंदिराच्या जीर्णाेद्धारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत माजी सरपंचाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना वारूंजी (ता. कऱ्हाड) येथे सोमवारी दुपारी घडली. यावेळी झालेल्या धुमश्चक्रीप्रकरणी कऱ्हाड शहर पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यावरून नऊजणांवर गुन्हा दाखल करण्यात आलक असून, चारजणांवर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कऱ्हाडनजीक वारूंजी गावात सोमवारी मारुती मंदिराच्या जीर्णाेद्धाराबाबत चर्चा करण्यासाठी सभा बोलविण्यात आली होती. या सभेत वाद होऊन मारामारी झाली. जमावाने माजी सरपंच नामदेव पाटील यांना मारहाण केल्याचा आरोप आहे, तर नामदेव पाटील यांच्या गटाने केलेल्या मारहाणीत तिघे जखमी झाल्याचे दुसऱ्या गटाचे म्हणणे आहे. याबाबत नामदेव काशीनाथ पाटील (वय ४३, रा. वारुंजी, ता. कऱ्हाड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंद्रजित अरुण पाटील, भास्कर बाळकृष्ण पाटील, चंद्रकांत दाजी पाटील, विशाल चंद्रकांत पाटील, प्रवीण सदाशिव पाटील, दिलीप रामचंद्र पाटील, विकास श्रीरंग पाटील, सचिन भास्कर पाटील (सर्व रा. वारूंजी) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. प्रशांत भीमराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माजी सरपंच नामदेव काशीनाथ पाटील, बाळासाहेब काशीनाथ पाटील, मुकुंद काशीनाथ पाटील, नयन बाळासाहेब पाटील यांच्यावर अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नामदेव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मंदिराच्या बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याकरिता ४ लाख ३० हजार रुपये खर्च केले होते. ते पैसे त्यांना २० मे २०१५ रोजी परत मिळाले होते. उर्वरित कामावर चर्चा करण्यासाठी सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयात बैठक बोलावली होती. चर्चा सुरू असताना इंद्रजित अरुण पाटील याने नामदेव पाटील यांना ‘तुम्ही आमच्या घरातील व्यक्तीबाबत उलटसुलट का बोलला,’ अशी विचारणा केली. त्याने नामदेव पाटील यांचा हात धरून बाहेर आणले. त्यानंतर त्याच्यासह इतरांनी नामदेव पाटील यांना मारहाण केली. याउलट प्रशांत भीमराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,ग्रामपंचायत कार्यालयात मंदिर बांधकामाची चर्चा सुरू असताना नामदेव पाटील यांच्यासह इतरांनी धक्काबुक्की करून शिवीगाळ केली. या मारहाणीत भास्कर पाटील व चंद्रकांत पाटील हे जखमी झाले. याबाबतची नोंद कऱ्हाड शहर पोलिसांत झाली असून, दोन्ही गटांतील आरोपींची पोलिसांकडून धरपकड सुरू आहे. (प्रतिनिधी)