शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

‘कुंभी-कासारी’साठी आता धुमशान

By admin | Updated: October 29, 2014 00:15 IST

डिसेंबर-जानेवारीमध्ये निवडणुका : संचालकांची संख्या चारने कमी होणार असल्याने नेत्यांची होणार गोची

प्रकाश पाटील - कोपार्डे -कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत २० डिसेंबर २०१४ मध्ये संपत असून, नवीन संचालक मंडळासाठी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अथवा जानेवारी २०१५ मध्ये निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे. त्याबाबत हालचाली सुरू असून, २१ जणांचे संचालक मंडळ ९७ व्या घटना दुरुस्तीनुसार अस्तित्वात येणार आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये जी ईर्षा दिसून आली, तशीच ईर्षा कुंभी-कासारीच्या निवडणुकीत दिसणार असून, एकास एक लढत आमदार चंद्रदीप नरके यांना देण्यासाठी विरोधकांकडून नियोजन सुरू आहे.विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ‘कुंभी’चे अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके यांच्या विरोधात विरोधी शाहू आघाडीचे सर्व नेते पी. एन. पाटील यांच्या बाजूने जोमात कामाला लागले आहेत. ‘कुंभी’च्या २०१४ ते २०१९ या पंचवार्षिक निवडणुकीचा मोठा संदर्भ या नेत्यांच्या एकत्र येण्यामागे होता, हे स्पष्ट चित्र विधानसभेच्या प्रचारसभेतही दिसत होते. निवडणूक विधानसभेची, मात्र सभेत आरोप-प्रत्यारोप ‘कुंभी’च्या कारभारावरून सुरू व्हायचे. यामुळे निवडणूक विधानसभेची की कुंभी-कासारी कारखान्याची, असा संभ्रम निर्माण होत होता. मात्र, आमदार आपला असेल, तर कुंभी-कासारीच्या २०१४-१९ च्या पंचवार्षिकचे मिशन यशस्वी करण्यात कोणतीच अडचण येणार नाही, हा विश्वास विरोधी नेत्यांमध्ये होता.विधानसभेत अपयश आले असले तरी नरके यांना मिळालेल्या यशाने विरोधकांत जोश आला असून, पूर्ण ताकदीचे उमेदवार देण्यासाठी विरोधकांतून चाचपणी चालली आहे.विधानसभेत मिळालेल्या विजयाने अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके यांच्या गोटात चैतन्य आहे. कुंभी-कासारी कारखाना चालवावा, तर तो नरके घराण्याने ही येथील सभासदांची मानसिकता कॅश करण्याचे कसब नरके घराण्याकडे असल्याने उमेदवारीसाठी नरके पॅनेलमध्ये स्थान मिळावे, यासाठी अनेकांनी आतापासूनच देव पाण्यात ठेवण्यास सुरुवात केली आहे. ९७ व्या घटना दुरुस्तीनुसार संचालकांची संख्या चारने घटली असून, यात संस्था प्रतिनिधी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व सर्वसाधारण गटातील दोन असे चार प्रतिनिधी कमी होणार आहेत.एकूण मतदान : २३ हजार ७०७कुंभी-कासारीचे कार्यक्षेत्र : १७९ गावेकरवीर : १४ हजार ४९पन्हाळा : ७ हजार ६५७शाहूवाडी : ५६१राधानगरी : ७१०गगनबावडा : ७३०असे असेल संचालक मंडळसर्वसाधारण गट : १६महिला गट : ०२मागासवर्गीय गट : ०१इतर मागास गट : ०१भटकी जमात : ०१एकूण संचालक : २१२१ हजार मतदानकरवीर, पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, गगनबावडा अशा पाच तालुक्यांत कार्यक्षेत्र येते. यात करवीरमध्ये १४ हजार ४९ व पन्हाळ्यात ७ हजार ६५० असे २१ हजार ७०६ सर्वाधिक मतदान आहे. यात मागील पंचवार्षिक निवडणुकीत विरोधी शाहू आघाडीला करवीरमधून प्रत्येक उमेदवाराला किमान एक हजार ते १५०० मतांचे मताधिक्य होते; पण पन्हाळ्यात मतमोजणी जाताच हे मताधिक्य कमी होत आमदार नरके यांच्या पॅनेलच्या सर्वसाधारण गटातील सर्व उमेदवारांनी एक हजार ते दोन हजारांच्या मताधिक्याने विजय मिळविला. फक्त संस्था गटातील विरोधी शाहू आघाडीच्या पी. जी. शिंदे यांना यश मिळाले.