शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
3
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
4
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा
5
Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
6
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
7
त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट
8
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
9
मुंबई ते लंडन... लवकरच बोहल्यावर चढणाऱ्या अर्जुन तेंडुलकरची संपत्ती किती? तुमचाही विश्वास नाही बसणार
10
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!
11
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
12
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
13
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
15
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
16
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
17
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
18
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
19
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
20
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."

‘धूम’ स्टाईलने चोरी करणार्‍या टोळीसह सराफ अटक

By admin | Updated: May 22, 2014 01:09 IST

गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली अटक

 इचलकरंजी : मोटारसायकलीवरून ‘धूम’ स्टाईलने चोरी करून जिल्ह्यात थैमान घालणार्‍या चोरट्यांच्या टोळीला, चोरीचे सोने विकत घेणार्‍या सोनारासह चौघांना येथील गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून साडेसात तोळे सोने व दोन मोटारसायकली असा तीन लाख २० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीतील आणखी दोघेजण फरार असल्याचेही पथकाचे प्रमुख मानसिंग खोचे यांनी सांगितले. सतीश विश्वास जोगदंडे (वय २६), संदीप चंद्रकांत सोनवणे (२१, दोघे रा. पेठवडगाव), सूरज मच्छिंद्र कोळी (१९, रा. लाटवडे) अशी अटक केलेल्या तिघा संशयित चोरट्यांची नावे आहेत; तर गणेश रतन नवळे व प्रदीप चंद्रकांत सोनवणे हे त्यांचे दोन साथीदार फरार आहेत. या टोळीतील चोरट्यांकडून चोरीचे सोने विकत घेणारा सोनार अशोक शांतिलाल राठोड (४०, रा. पेठवडगाव) यालाही पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, शिरोळ तालुक्यातील उदगाव बसस्थानक परिसरात संशयितरीत्या फिरताना सतीश जोगदंडे हा पोलिसांना आढळला. पेठवडगावमधील जैन मंदिरात झालेल्या चोरीतील मुख्य संशयित म्हणून जोगदंडे याचे नाव पुढे आले असून, तो फरार होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले, तर जयसिंगपूर येथील क्रांती चौक परिसरात सूरज व संदीप हे दोघे संशयितरीत्या फिरताना मिळून आले. पोलिसांनी तिघांनाही अटक करून त्यांच्याकडे चौकशी सुरू केली. तपासामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी, हातकणंगले, जयसिंगपूर अशा पाच ठिकाणी ‘धूम’ स्टाईलने सोन्याचे दागिने चोरल्याचे त्यांनी कबूल केले. त्याचबरोबर कºहाड, सातारा, सांगली, विजापूर या परिसरात सोळा गुन्हे असे एकूण २१ गुन्हे केल्याचे चोरट्यांनी प्राथमिक तपासात कबूल केले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून साडेसात तोळे वजनाचे दागिने व एमएच ०९ डीडी २४८१, एमएच ०९ व्हीएल ३८४८ अशा दोन मोटारसायकली असा एकूण तीन लाख २० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई इचलकरंजीत गुन्हे अन्वेषण पथकातील कर्मचारी संतोष शेळके, राजू नलवडे, इम्रान सनदी, विजय तळसकर, आदींनी केली आहे. (प्रतिनिधी)