शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

‘धोनी’चा मावा, नको खाऊ भावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 00:47 IST

एकनाथ पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : मावा, मेफेड्रोन (ड्रग्ज), अफू, चरस, गांजा, भांग अशा अमली पदार्थांची विक्री ...

एकनाथ पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मावा, मेफेड्रोन (ड्रग्ज), अफू, चरस, गांजा, भांग अशा अमली पदार्थांची विक्री शहरासह उपनगरांत खुलेआम सुरू आहे. शाळा, महाविद्यालयांसह शहरातील उच्चभ्रू वर्गांतील काही व्यक्तींकडून व्यसनासाठी अमली पदार्थांची मागणी होत आहे. मंगळवार पेठ परिसरातील ‘धोनीचा मावा’ शहरात प्रसिद्ध आहे. रात्रभर मावा तयार करून दिवसभरात तो किलोच्या पिशव्यांनी शहरभर विक्रीसाठी ठिकठिकाणी रवाना केला जात आहे. हा मावा तरुणपिढीचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहे.पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी अवैध व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उचलला असला तरी बिनदिक्कत अमली पदार्थांची विक्री शहर, उपनगरांत सुरू आहे. सकाळी कॉलेजला येणारा बहुतांश तरुणवर्ग उद्यानात अमली पदार्थांचे सेवन करत असतानाचे भयावह चित्र पाहायला मिळत आहे. हे व्यसन पालकांची डोकेदुखी झाले आहे.राज्यात गुटखा व सुगंधी तंबाखूसारख्या अमली पदार्थ विक्रीवर शासनाने बंदी घातली आहे; परंतु छुप्या मार्गाने आजही या पदार्थांची विक्री केली जात असल्याचे पोलीस व अमली पदार्थ पथकांच्या कारवाईवरून स्पष्ट होते. दरम्यान, कोल्हापुरात हायफाय अमली पदार्थांची मागणी वाढत आहे.हुक्का पार्लर सध्या बंद असली तरी हुक्क्याचे साहित्य शहरात सहजपणे उपलब्ध होत आहे. मंगळवार पेठ परिसरातील ‘धोनी’ नावाने प्रसिद्ध असलेल्या व्यक्तीच्या नावाने सुरु असलेल्या माव्याने शहरात थैमान घातले आहे. शिवाजी पेठ परिसरात किराणा दुकानाच्या नावाखाली बादल्या भरून मावा तयार केला जात आहे. शाळा, कॉलेज परिसरात या माव्याची राजरोस विक्री होत आहे. या अमली पदार्थांची देवघेव करण्यासाठी शहरभर विक्रेत्यांचे जाळे आहे. अनेक छोट्या-मोठ्या विक्रेत्यांकडून ग्राहकांपर्यंत त्याचा पुरवठा केला जात आहे.सांकेतिक भाषेत मागणी : अमली पदार्थांची मागणी व व्यवहार सांकेतिक भाषेत चालतात. प्रत्येक अमली पदार्थासाठी एक विशिष्ट कोड तयार करण्यात आला आहे. कोकेनसाठी ‘कोक’, गांजासाठी ‘वीड’, हशीशसाठी ‘हसत’, एमडीसाठी ‘बुक’ या सांकेतिक शब्दांचा वापर केला जात आहे. या अमली पदार्थांची गुजरात, जम्मू-काश्मीरमधून देशभरात तस्करी केली जाते.झोप न येण्यासाठी सेवनशहरातील उच्चभ्रूवर्गातील काही विद्यार्थी-विद्यार्थिनी अभ्यास करताना झोप येऊ नये म्हणून अशा अमली पदार्थांचे सेवन करीत आहेत. त्यांच्याकडून व्यसनासाठी अमली पदार्थांची मागणी केली जात आहे. शरीराला लागलेली ही सवय त्यांना मृत्यूच्या दाढेपर्यंत नेत आहे.