शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
5
Operation Sindoor Live Updates: आम्हाला दहशतवाद संपवायचाय, तुम्ही धाडस करा, कपिल सिब्बल यांचा मोदींवर निशाणा
6
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
7
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
8
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
10
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
11
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
12
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
13
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
14
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
15
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
16
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
17
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
18
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
19
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
20
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?

कोल्हापूर, सांगलीच्या कुटुंबांना धम्मदीक्षा

By admin | Updated: January 30, 2017 01:01 IST

धम्म परिषद : पाच वर्षांत एक कोटी धम्म उपासक करण्याचा निर्धार : सुशीलकुमार कोल्हटकर

कोल्हापूर : धम्मदेसना, दीक्षा, प्रबोधनपर शाहिरी कार्यक्रम, व्याख्यान अशा विविध उपक्रमांनी रविवारी बौद्ध प्रणाली चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित दुसरा धम्म दीक्षा सोहळा आणि धम्म परिषद पार पडली. यात कोल्हापूर, सांगलीमधील ५० कुटुंबांनी धम्मदीक्षा घेतली. येथील दसरा चौकात सकाळी या सोहळ्याचे उद्घाटन भन्ते यश काश्यपायन महाथेरो (जयसिंगपूर), आर. आनंद (हुपरी), एस. संबोधी (आजरा), काश्यप (पुणे), धम्मसेना (आसाम), आनंद सुमनगिरी (सांगोला), विमलकीर्ती (जत) यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी आर्या काळे हिने आम्रपाली नृत्य सादर केले. यानंतर कोल्हापूर, सांगलीमधील ५० कुुटुंबांतील २५० जणांना भन्ते यश काश्यपायन महाथेरो यांनी धम्मदीक्षा दिली. यावेळी भन्ते एस. संबोधी म्हणाले, बौद्ध धम्म मानवमुक्तीसाठी आहे. जातिपातींऐवजी कर्मावर विश्वास ठेवा. कर्मच तुम्हाला तारणार आहे. भन्ते यश काश्यपायन महाथेरो म्हणाले, जातिव्यवस्थेतून बाहेर पडल्याशिवाय मुक्त श्वास घेता येत नाही. त्यासाठी बौद्ध धम्माचा स्वीकार करा. कार्यक्रमात ट्रस्टचे अध्यक्ष सुशीलकुमार कोल्हटकर यांनी प्रास्ताविक केले. यात त्यांनी ट्रस्टच्या कार्याची माहिती दिली. येत्या पाच वर्षांत एक कोटी धम्म उपासक करण्यात येतील. त्यासाठी राष्ट्रीय बुद्ध अभियान राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तकदीर कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. स्वागताध्यक्ष बाळासाहेब भोसले, ट्रस्टचे सचिव सुबोधकुमार कोल्हटकर, व्यंकाप्पा भोसले, भरत रसाळे, अनिल म्हमाणे, सुभाष देसाई, आदी उपस्थित होते. सोहळ्यास कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, बेळगाव परिसरातील धम्म उपासक उपस्थित होते. परिषदेत प्रा. डॉ. शरद गायकवाड यांचे ‘मानवमुक्तीचा मार्ग - बौद्ध धम्म’ या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी प्राचार्य डॉ. अच्युत माने, एस. पी. कांबळे, अमर कांबळे, आदी उपस्थित होते. दुपारी विद्रोही शाहीर रणजित कांबळे यांचा आणि सायंकाळी ‘आवाज भीमाचा’ हा कार्यक्रम झाला.