शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

धनगर समाजास सवलती लागू करणार

By admin | Updated: September 20, 2015 23:28 IST

चंद्रकांत पाटील : चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

इस्लामपूर : धनगर समाजास अनुसूचित जमातीच्या सवलती लागू करण्यास राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी धनगर समाजाने शासनाला थोडा अवधी द्यावा. या समाजाला केंद्र व राज्य सरकारच्या सोयी-सवलती लागू करण्याचा निर्णय लवकरच करू. तसेच धनगर समाजास आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. याचवेळी त्यांनी चौंडीच्या विकास कामांकरिता मोठा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाहीही दिली.चौंडी (ता. जामखेड) येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २२१ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक़्रमात ते बोलत होते. त्यांच्याहस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या ११ फूट उंचीच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. धनगर समाज महासंघाचे संस्थापक, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रामहरी रूपनवर, आमदार कपिल पाटील उपस्थित होते.पाटील म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मगाव चौंडी येथे राष्ट्रीय स्मारक करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यासह त्यांच्या जयंतीदिनी ३१ मे रोजी शासकीय सुट्टी जाहीर करण्यासंदर्भात मंत्रिमंडळात चर्चा करू. अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाचा अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र अभ्यास मंडळ निर्माण करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. अण्णासाहेब डांगे म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार तळागाळात गेले पाहिजेत. सार्वभौम संस्कृतीची निर्मिती त्यांनी केली आहे. त्यांच्याबाबतीत राज्य सरकारच्यावतीने स्वतंत्र लेखन व्हायला हवे. धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नांसंबंधित तांत्रिक बाबींसाठी एक समिती नेमून समाजास अनुसूचित जमातीच्या सोयी-सवलती लागू झाल्या पाहिजेत. आरक्षणाच्या प्रश्नासाठी सत्याग्रही विचाराने आमचा लढा सतत सुरू आहे.श्रीराम पुंढे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी अण्णासाहेब डांगे यांनी लिहिलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. अहिल्यादेवींचा पुतळा भेट दिल्याबद्दल आमदार कपिल पाटील यांचाही सत्कार करण्यात आला.आमदार रुपनवर पाटील, जिल्हाधिकारी अनिल कवडे, डॉ. अलकाताई कोरे, सौ. पुष्पलता गुलवाडे यांची भाषणे झाली. मेळाव्यास आमदार नारायण पाटील, आमदार बाळासाहेब मुरकुटे, अ‍ॅड. चिमण डांगे, सुनील मलगुंडे, सुवर्णाताई खरात, नंदाताई शेळके, प्रा. आर. एस. चोपडे यांच्यासह धनगर समाज बांधव उपस्थित होते. बजरंग कदम यांनी सूत्रसंचालन केले. बबनराव रानडे यांनी आभार मानले. (वार्ताहर)पाठपुरावा करणार धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नांसंबंधित तांत्रिक बाबींसाठी एक समिती नेमून समाजास अनुसूचित जमातीच्या सोयी-सवलती लागू झाल्या पाहिजेत, अशी मागणी डांगे यांनी केल्यानंतर त्याला उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी, याबाबत पाठपुरावा करून लवकरात लवकर सवलती देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.