शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

धामणी नदीचे पात्र कोरडे

By admin | Updated: April 24, 2017 00:00 IST

तीव्र पाणीटंचाई : धामणी प्रकल्पाचा प्रश्न ऐरणीवर

महेश आठल्ये ल्ल म्हासुर्लीमातीच्या बंधाऱ्यात अडविलेले पाणी संपल्याने धामणी नदीचे पात्र कोरडे पडले असून, धामणी खोऱ्यातील २० ते २५ गावांत तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. नदीत जेसीबीद्वारे खड्डे खोदून पाणी मिळविण्यासाठी शेतकऱ्यांत जणू स्पर्धा लागली असून, या पाण्यावरून मोठ्या वादाचे प्रसंग उद्भवू लागले आहेत. खोऱ्यातील तीव्र पाणीटंचाईमुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पिके करपत असून, शेतकरी वळवाच्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. यामुळे धामणी प्रकल्पाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रकल्पाचे काम या महिन्यात सुरू करण्याचे मुंबई येथील बैठकीत गत महिन्यात दिलेले आश्वासन निव्वळ आश्वासनच राहणार का? असा प्रश्न शेतकऱ्यांतून उपस्थित होत आहे.धामणी खोऱ्यात पावसाळ्यात मुबलक पाऊस पडतो. मात्र, साठवण प्रकल्प नसल्याने सर्व पाणी वाहून जाते. परिणामी, धामणी खोऱ्यात जानेवारीपासूनच पाणीटंचाई जाणवते. यासाठी शेतकरी स्वखर्चाने व श्रमदानाने धामणी नदीवर मातीचे बंधारे घालून पाणी अडवून ते काटेकोर नियोजनाने पुरवून वापरतो व आपली पिके वाढवतो. मात्र, हे पाणी मार्च-एप्रिलमध्येच संपून जाते. या खोऱ्यास सुमारे तीन महिने तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागतात. सध्या राही-कंदलगावपासून पणोरेवर सुमारे ४० च्या आसपास वाड्या-वस्त्या सध्या नदीपात्रातील मातीच्या बंधाऱ्यातील पाणी संपल्याने पाणीटंचाईच्या फेऱ्यात अडकल्या आहेत. सर्वच बंधारे कोरडे पडले असून, नदीपात्रात वाळवंट तयार झाल्याचे भासते. सध्या पाणी मिळविण्यासाठी शेतकरी नदीपात्रात जेसीबीद्वारे खड्डे खोदून पाणी मिळविण्यासाठी धडपडत असून, त्यातही त्यांना अपयश येत आहे. सध्या या परिसरात शेतीसह जनावरे व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, नळपाणीपुरवठा योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. येत्या आठवड्याभरात नागरिकांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागणार असून, खोऱ्यातील बळिराजा हवालदिल झाला आहे.या खोऱ्यास वरदान ठरणाऱ्या धामणी प्रकल्पाचे काम अद्यापहीसुरू न झाल्याने, तसेच झापावाडी व पणोरे येथील लघुपाटबंधारे प्रकल्पांची कामेही संथगतीने सुरू असल्याने येत्या दोन वर्षांतही या खोऱ्यातील पाणीटंचाई कमी होण्याबद्दल साशंकता व्यक्त होत आहे. सध्या खोऱ्यातील पिके वाळू लागली असून, शेतकऱ्यांना आर्थिक संकटास सामोरे जावे लागणार असल्याने तो हवालदिल झाला आहे.