शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

ढगांचा ढोल अन् विजांचे तांडव!

By admin | Updated: June 8, 2014 01:18 IST

मध्यरात्री कोल्हापूरकरांचा थरकाप : जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले

कोल्हापूर : कानठळ्या बसवणारा ढगांचा गडगडाट व थरकाप उडविणाऱ्या विजेच्या कडकडाटाने आज, शनिवारी पहाटे साखरझोपेत असलेल्यांची झोप उडवली. ढगांचे ढोल वादन, विजांचे सुरू असलेले तांडवनृत्य त्याच्या जोडीला सोसाट्याचा वारा यांच्या साक्षीने वरुणराजाने कोल्हापूर जिल्ह्याला अक्षरश: झोडपून काढले. चक्क सुर्यप्रकाशासारखा विजेचा लखलखाट तब्बल पाऊण तास सुरू राहिला. खवळलेल्या समुद्रात प्रचंड लाटा उसळाव्यात तसा आभाळात ढगांचा गडगडाट होत होता. या स्थितीत मुलाबाळांना पोटाशी धरून अनेक जण भीतीने अक्षरश: गोठून गेले.वादळी वारे व ढगांचा गडगडाट हा वादळी पावसावेळी कायमच होतो, परंतु कालची तऱ्हा न्यारीच होती. अशा प्रकारच्या विजा कडाडणे व ढगांचा गडगडाट मागच्या पाचपंचवीस वर्षांत अनुभवला नसल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या. येत्या पावसाळ््यात काही विपरीत तर घडणार नाही ना, अशी भीतीही त्यातून व्यक्त झाली. शुक्रवारी दिवसभर व रात्रीही वातावरणात कमालीचा उष्मा होता. मध्यरात्री अडीचनंतर एकदम विजेच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा सुरू झाला. वाऱ्यामुळे झाडे जमिनीवर लोळण घेत होती. वाऱ्यामुळे अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला, तर काही ठिकाणी विजेच्या तारा तुटल्याने वीज बंद झाली. घरात अंधार आणि बाहेर आकाशात विजांचे तांडवनृत्य पाहून सर्वांचीच झोप उडाली. वारे इतके जोरदार होते की, घरांच्या खिडक्या उघडण्याचे धाडसही होत नव्हते. विजेचे असे रौद्ररूप पहिल्यांदाच अनुभवण्यास मिळाल्याने लोकांचा भीतीने थरकाप उडाला. ढगांचा कानठळ्या बसवणारा आवाज होत होता. जमिनीला घासून विजेचा खेळ सुरू असल्याने घराबाहेर पडण्याचे धाडसही होत नव्हते. विजेचा लखलखाट डोळे दीपवणारा होता. नेहमी होणाऱ्या विजेचा वेग कमालीचा असतो; पण ही वीज संथगतीने जात असल्याने कोणत्याही क्षणी आपल्या घरावर कोसळेल, अशी भीती वाटत होती. त्यानंतर जोरदार पाऊस सुरू झाला. आडव्या-तिडव्या पावसाने अक्षरश: झोडपून काढले. पाऊस सुरू झाला तरी विजांचा कडकडाट सुरूच होता. वीज झाली की घराच्या खिडक्यांच्या काचा, घरातील भांड्यांचा आवाज व्हायचा. जणू धरणीकंप झाल्यासारखे (पान ७ वर)