शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

देवस्थान जमिनीवर मालकी हक्क द्या

By admin | Updated: March 28, 2016 00:44 IST

संतराम पाटील : शेतकरी मेळाव्यात ठराव

कोल्हापूर : गेली अनेक वर्षे कसत असलेल्या देवस्थानच्या जमिनीवर संबंधित शेतकऱ्यांना मालकी हक्क द्या, संघटनेशी चर्चा केल्याशिवाय समितीच्या शिफारशी लागू करू नयेत, असे ठराव महाराष्ट्र राज्य देवस्थान इनाम जमीनधारक शेतकरी संघटनेच्या मेळाव्यात करण्यात आले. इनाम जमीनधारक शेतकऱ्यांचा रविवारी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात मेळावा झाला. अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतराम पाटील होते. देवस्थान जमिनीच्या मालकी हक्कांसाठी गेली पंधरा वर्षे संघर्ष सुरू असून, त्याला आता कुठेतरी यश येत असल्याचे सांगत संतराम पाटील म्हणाले, यश येते म्हटल्यावर अनेक मंडळी श्रेयासाठी पुढे येत आहेत. आम्हाला कोणत्याही गोेष्टीचे श्रेय घ्यायचे नाही; पण या शेतकऱ्यांचा प्रश्न सुटला पाहिजे, या हेतूने १९९९ सालापासून काम करत आहोत. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी देवस्थान जमिनीबाबत विचारविनिमय करण्यासाठी समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे; पण या समितीवर संघटनेचा एक प्रतिनिधी घ्यावा, जेणेकरून या शेतकऱ्यांची दुखणी त्यांना समजतील. सरकारची पावले चांगल्या दिशेने पडत असल्याने इनामी जमिनीबाबत सरकार निश्चितच चांगला निर्णय घेईल. चौकशी समितीच्या शिफारशी लागू करण्यापूर्वी संघटनेशी चर्चा करावी अन्यथा सरकारलाही ताकद दाखवावी लागेल, असा इशारा पाटील यांनी दिला. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कारभारावर सडकून टीका करताना संघटनेचे सचिव प्रा. वसंत चांदूरकर म्हणाले, जमिनी कसून सरकारला आम्ही खंड कशासाठी भरायचा? पाच जिल्ह्यांतील शेतकरी शेकडो किलोमीटरवरून खंड जमा करण्यासाठी येतात; पण देवस्थान समितीत लिपिकच नाही; त्यामुळे अनेक वेळा खंड भरता येत नाही; पण त्यासाठी दंड आकारला जातो., हे अन्यायी असल्याचे सांगत इतर अधिकारातून मालकी हक्काच्या जमिनी व्हाव्यात एवढीच मागणी असल्याचे प्रा. चांदूरकर यांनी सांगितले. अनंत चौगुले, राजेंद्र माने, मदन मस्के, आदींनी मनोगत व्यक्त केले. तुळसाराम पाटील, निवृत्ती बच्चे, बाबूराव कदम, रघुनाथ भोसले, किरण पाटील, सुनीता कोरे, राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते. प्रकाश कांबळे यांनी आभार मानले.