शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

देवेंद्र दरबारी आता पालिका पदाधिकारी, सदस्यांची बारी...

By admin | Updated: March 9, 2015 23:51 IST

एलबीटीचा प्रश्न : २८२ कोटींच्या नुकसान भरपाईचा प्रस्ताव

सांगली : एलबीटीप्रश्नी व्यापारी संघटनांशी तीन ते चार वेळा चर्चा करून झाल्यानंतर, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारी सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. व्यापाऱ्यांनीमहापालिकेची छळकथा ऐकविल्यानंतर आता महापालिका पदाधिकाऱ्यांनीही व्यापाऱ्यांची बहिष्कारकथा मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यासाठी तयारी केली आहे. त्याचबरोबर २८0 कोटी रुपयांची मदतवजा नुकसान भरपाई शासनाने द्यावी, अशा मागणीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या एलबीटीचा प्रश्न आता राज्याच्या पटलावर गाजत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याठिकाणच्या व्यापारी प्रतिनिधींना तीन ते चारवेळा चर्चेला बोलावले होते. त्यांच्या काही मागण्यांची दखलही घेण्यात आली. एलबीटीचा प्रश्न आगामी आर्थिक वर्षात संपणार असला तरी, मागील एलबीटीची थकबाकी अजूनही तशीच आहे. नगरविकास खात्याच्या सचिव मनीषा म्हैसकर यांनी महापालिका आयुक्तांना दूरध्वनीवरून, कारवाईबाबत सबुरीने घेण्याचा सल्ला दिल्यामुळे महापालिका प्रशासन सध्या शांत आहे. या गोष्टीचा पदाधिकाऱ्यांना, नगरसेवकांना त्रास होऊ लागल्याने त्यांनी मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली. फडणवीस यांनी महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना येत्या १५ मार्च रोजी भेटण्यास बोलावले आहे. देवेंद्रदरबारी आता महापालिका आर्थिक गाऱ्हाणे मांडणार आहे. व्यापाऱ्यांनी घेतलेल्या बहिष्काराच्या भूमिकेमुळे महापालिकेचा विकास ठप्प झाला आहे. महापालिकेचा अर्थसंकल्पही कोलमडला आहे. शासनाने दूरध्वनीवरून प्रशासनाला सबुरीचा सल्ला दिल्यामुळे प्रशासन कारवाई करण्यास धजावत नाही. अशावेळी शासनाने एलबीटीची थकबाकी, दंड आणि व्याज यापोटी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेस २८0 कोटी रुपये द्यावेत, असा प्रस्तावच महापौर विवेक कांबळे यांनी तयार केला आहे. शासनाने व्यापाऱ्यांच्या बाजूने कोणताही निर्णय घेताना नागरिकांचा आणि महापालिकेचा विचार करावा. माफी किंवा सवलत देताना तेवढ्या नुकसानीची तजवीज शासनाने करावी, असेही प्रस्तावात म्हटले आहे. (प्रतिनिधी)मोठे शिष्टमंडळ जाणारमहापौरांसह खासदार रामदास आठवले, माजी मंत्री आ. पतंगराव कदम, विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, सभागृह नेते किशोर जामदार, स्थायी समिती सभापती संजय मेंढे, तसेच अनेक नगरसेवक या शिष्टमंडळात असणार आहेत. शासनाचा घटकपक्ष म्हणून आठवले महापालिकेची बाजू मांडणार आहेत, असे कांबळे म्हणाले.