शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
3
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'त्या' मरकजला केले जमीनदोस्त
4
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
5
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
6
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
7
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
8
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
9
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
10
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
11
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
12
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
13
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
14
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
15
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
16
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
17
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
18
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
19
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
20
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले

पेठवडगावसाठी दहा कोटींची नगरोत्थानमधून विकासकामे

By admin | Updated: August 8, 2014 00:42 IST

नगरपालिका सभा : विविध कामांना मंजुरी

पेठवडगाव : वडगाव नगरपालिका सभेत नगरोत्थानमधून रस्ते, गटर्स, स्मशानभूमी, दलित वस्ती अंतर्गत रस्ते व गटर्स, सुधारित पाणीपुरवठा अशा सुमारे दहा कोटींच्या प्रस्तावित विकासकामांना एकमताने मंजुरी देण्यात आली. आज, गुरुवारच्या सभेत किरकोळ अपवाद वगळता सभा खेळीमेळीत झाली.नगराध्यक्षा विद्या पोळ यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा झाली. यामध्ये विषयपत्रिकेवरील १२, तर आयत्या वेळच्या सहा विषयांवर चर्चा करीत निर्णय घेण्यात आले. प्रश्नोत्तरामध्ये नगराध्यक्षा पोळ यांनीच मोकाट जनावरांचा प्रश्न मांडला. यावर कारवाई केली का, असा थेट प्रश्न प्रशासनास विचारला. यावेळी संबंधित संशयित जनावरे मालकांना मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशा नोटिसा देण्यात आल्याचे सांगण्यात आले.संतोष गाताडे यांनी सणगर-कुंभार गल्लीतील रखडलेल्या शौचालयाचा प्रश्न मांडला. यामुळे दोन समाजात गैरसमजातून तेढ पसरत असल्याचे सांगितले. यावेळी प्रशासनाने हा प्रश्न न्यायप्रविष्ठ झाल्याचे सांगितले.यावर रंगराव पाटील-बावडेकर यांनी पालिका प्रशासन प्रत्येक गोष्टीत कायदेशीर सल्ला घेते, असा टोला हाणला. यापुढे नागरिकांच्या विकासकामांत अडथळे येऊ नयेत यासाठी प्रशासनाने दक्ष राहिले पाहिजे, असे आवाहन केले. यावेळी अशा अनेक संभावित प्रश्नाबाबत न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्याचे ठरविण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष मोहनलाल माळी यांनी मैलखड्ड्यामध्ये अस्वच्छता पसरत आहे. त्याच्या नियोजनासाठी लोकसहभातून स्वच्छता करण्यास तयार आहोत. तसा ठराव करण्याचा आग्रह केला. यास रंगराव पाटील यांनी आक्षेप घेतला. यावेळी दोघांच्यात खडाजंगी झाली. विशेष म्हणजे तसे निवेदन विराधी नगरसेवक सुनीता पोळ यांच्यावतीने दिले होते. अखेरीस हा विषय प्रलंबित ठेवून त्यावर पडदा पडला. यावेळी झालेल्या चर्चेत विजयसिंह यादव, सुनील हुक्केरी, राजकुमार पोळ, विश्रांत माने, राजेंद्र देवस्थळी, निर्मला सावर्डेकर यांनी भाग घेतला. (प्रतिनिधी)