शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
2
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
3
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
5
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
6
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
7
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
8
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
9
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
10
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
11
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
12
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
13
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
14
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
15
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
16
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
17
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
18
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
19
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
20
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा

विकासपूर्ण योजनांनी राजेंद्रनगराचा कायापालट

By admin | Updated: June 20, 2016 01:02 IST

सतेज पाटील : साळोखेनगर ते कागल केएमटी बससेवा, विविध विकासकामांचे उद्घाटन

कोल्हापूर : राजेंद्रनगर प्रभागाचे विद्यमान नगरसेवक व परिवहन समितीचे सभापती लाला भोसले यांनी आपल्या प्रभागात ‘दत्तक झाड योजना’ अशासारख्या नावीन्यपूर्ण योजनेमुळे पर्यावरण संतुलनासाठी हातभार लावला आहे. तसेच या प्रभागात लहान मुलांना खेळण्यासाठी बगीच्यासह येथील कामगारवर्गाची गरज ओळखून सुुरू करण्यात आलेली साळोखेनगर ते कागल के.एम.टी. सेवा उपयोगी ठरणार आहे. अशा विविध विकासपूर्ण योजनेमुळे राजेंद्रनगर प्रभागाचा कायापालट होत आहे. त्यांचा अशा नावीन्यपूर्ण योजनेस माझा सदैव पाठिंबा राहील, अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी दिली. राजेंद्रनगर प्रभागात येथे रविवारी विविध विकासकामांच्या प्रारंभप्रसंगी बोलत होते. याप्रसंगी महापौर अश्विनी रामाणे यांची प्रमुख उपस्थिती होती. राजेंद्रनगर येथे साळोखेनगर-एसएससी बोर्ड-शाहू नाकामार्गे कागल बससेवेचा प्रारंभ आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच याप्रसंगी शंभर गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्णा वाटप करण्यात आले. त्यासह परिसरातील शंभर नागरिकांना मोफत रोपवाटप करण्यात आले. छोट्या बागेचे उद्घाटन करण्यात आला. यासह महानगरपालिकेचे कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी परिवहन समितीचे सभापती लाला भोसले यांनी प्रभागातील विकासकामांचा आढावा सांगितला. दत्तक झाड योजनेस चांगला प्रतिसाद मिळत असून त्यामुळे परिसर हिरवागार होण्यास मदत होणार आहे. कार्यक्रमास नगरसेवक प्रतापसिंह जाधव, माजी नगरसेवक इंद्रजित बोंद्रे, माजी नगरसेविका जयश्री साबळे, राजू साबळे, रोहित चौगुले, व्यंकट सूर्यवंशी, बबलू रजपूत, संतोष कांबळे, शक्ती माटुंगे, गोट्या नागटिळे, अर्जुन वाघमारे, दत्ता मिसाळ, राजू बागडे यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.