शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
3
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
4
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
5
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
6
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
7
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
8
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
9
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
10
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
11
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
12
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
13
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
14
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
15
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
16
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
17
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
18
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
19
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
20
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!

कोल्हापूर जिल्ह्याचा विकास आराखडा कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 00:49 IST

तानाजी पोवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर ते सांगली राज्यमार्गाला पर्यायी रस्ता, कोल्हापूर शहराबाहेरुन रिंग रोड, इचलकरंजीसह काही नागरी संकुलांमध्ये बायपास रस्ते, नागरी विकास केंद्र असा भविष्यातील २० वर्षांचा विचार करून तयार केलेला कोल्हापूर जिल्ह्याचा प्रादेशिक विकास आराखडा सध्या ‘उत्साही’ अधिकाऱ्यांच्या गर्तेत लटकला आहे.आराखड्याला विरोध करण्यासाठी जिल्ह्यातून आलेल्या सुमारे ५३९० ...

तानाजी पोवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर ते सांगली राज्यमार्गाला पर्यायी रस्ता, कोल्हापूर शहराबाहेरुन रिंग रोड, इचलकरंजीसह काही नागरी संकुलांमध्ये बायपास रस्ते, नागरी विकास केंद्र असा भविष्यातील २० वर्षांचा विचार करून तयार केलेला कोल्हापूर जिल्ह्याचा प्रादेशिक विकास आराखडा सध्या ‘उत्साही’ अधिकाऱ्यांच्या गर्तेत लटकला आहे.आराखड्याला विरोध करण्यासाठी जिल्ह्यातून आलेल्या सुमारे ५३९० तक्रारी निवारणासाठी नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीला बैठक अथवा सुनावणी घेण्याचे भानच राहिलेले नाही. शासनाने समिती स्थापन करून तीन महिने उलटले. सप्टेंबरअखेर या तक्रारींचे निवारण करून शासनाला अहवाल सादर करणे आवश्यक असतानाही समितीचे सर्व कामकाज अद्याप ‘जैसे थे’ आहे.कोल्हापूर जिल्ह्याचा प्रादेशिक विकास आराखडा सुमारे ३८ वर्षांनंतर तयार होत आहे. महामार्गाला पर्यायी रस्ते, नागरी-ग्रामीण संकुले, तालुका मुख्यालये, रिंग रोड, पर्यटन विकासासाठी रस्त्यांचे जाळे, व्याघ्र प्रकल्प, आदींचा विकास नियंत्रण नियमावलीचा समावेश असणारा हा प्रादेशिक आराखडा तयार झाला; पण हा आराखडा सर्वसमावेशक समतोल ठेवणारा नसल्याची टीकाही यावेळी झाली. अनावश्यक रस्त्यांचे जाळे, अनावश्यक ट्रान्स्पोर्ट हबमुळे शेतकºयांची शेती, विहिरी, घरे उद्ध्वस्त होऊन शेतकरी अडचणीत आल्याच्या तक्रारी झाल्या. त्यातूनही हा विकास आराखडा सप्टेंबर २०१६ मध्ये प्रसिद्ध झाला. सुनावण्यांनंतर जानेवारी २०१८ मध्ये शासनाने तो मंजूर केला; पण असंख्य तक्रारींमुळे मोर्चे निघाले. चौका-चौकांत आराखड्याच्या प्रती जाळल्या. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोणावरही अन्याय होणार नाही अशी घोषणा केली. शासनाच्या वतीने मंजूर प्रादेशिक योजनांमध्ये महाराष्टÑ प्रादेशिक नियोजन व नगररचना नियमानुसार फेरबदलाची कार्यवाही सुचविण्याबाबत प्रस्ताव शासनास सादर करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमली. समितीने एकत्रित बैठक घेणे, हरकतींवर सुनावणी घेणे तसेच ३० सप्टेंबरपूर्वी योजनेतील सर्व त्रुटी निदर्शनास आणून त्याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करायचा आहे.शासनाचे निर्देश पायदळीसमिती नेमून तीन महिने झाले, तरीही समितीची एकही बैठक झाल्याचे दिसून येत नाही. तसेच सुनावणी घेण्यासाठी स्थानिक वृत्तपत्रांत जाहिरात देणे आवश्यक आहे. समितीने सर्व हरकती, सूचना, तक्रारी, सुनावणी घेण्यासाठी वेळ व ठिकाणे निश्चित करणे आवश्यक आहे; पण अशा काहीही हालचाली केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे प्रादेशिक विकास आराखड्याच्या नावाखाली गेले तीन महिने या त्रिसदस्यीय समितीकडून लोकांना फसविण्याचे काम सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांतून येत आहेत.त्रिसदस्यीय समितीकलम २० अन्वये आराखड्यातील फेरबदलाची कार्यवाही सुचवून अहवाल सादर करण्यासाठी नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीचे अध्यक्ष कोल्हापूर प्रादेशिक योजना नगररचनाचे उपसंचालक शिवराज पाटील हे असून, कोल्हापूर शाखा कार्यालयाचे सहायक संचालक नगररचनाकार धनंजय खोत आणि नगररचना विभागाचे निवृत्त उपसंचालक य. श. कुलकर्णी यांचा समावेश आहे.