शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

महानगरपालिकेत विकास निधी वाटपात भेदभाव

By admin | Updated: May 4, 2016 00:49 IST

कुरघोडीचे राजकारण : दोन्ही कॉँग्रेसच्या सदस्यांना ७.५० लाख, तर भाजप-ताराराणीच्या सदस्यांना ५.५० लाख

कोल्हापूर : गतवर्षी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आणलेला २0 कोटींचा निधी सर्व नगरसेवकांना समान वाटण्यात यावा, यासाठी आकांडतांडव करणाऱ्या कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नगरसेवकांनी यंदाच्या महानगरपालिका अर्थसंकल्पातील निधीचे वाटप करताना भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांना तुलनेने कमी निधी दिला आहे. सत्तारूढ आघाडीसह शिवसेनेच्या नगरसेवकांना ऐच्छिक निधी म्हणून प्रत्येकी साडेसात लाखांचा, तर ताराराणी आघाडी-भाजपच्या नगरसेवकांना साडेपाच लाख रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याने या विषयावर सत्तारूढ आणि विरोधी आघाडीत संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे. कोल्हापूर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प मंजूर करताना ३१ मार्चच्या सभेत सत्तारूढ गटाकडून उपसूचना दिली होती. या उपसूचनेनुसार प्रशासनाने सुचविलेला निधी आणि महासभेने त्यात केलेला बदल अंतिम करण्यात आला. प्रशासनाने सर्व नगरसेवकांना केवळ पाच लाखांचा ऐच्छिक निधी धरला होता. त्यात बदल करून कॉँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नगरसेवकांना प्रत्येकी ७.५० लाख रुपये, तर ताराराणी आघाडी व भाजपच्या नगरसेवकांना ५.५० लाख रुपये देण्याचा निर्णय महापौर अश्विनी रामाणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. याशिवाय उपनगरातील ५४ नगरसेवकांना एक लाखाचा निधी जादा देण्यात येणार आहे. प्रशासनाने शहरातील पॅचवर्क करण्यासाठी राखून ठेवलेला तीन कोटींचा निधी सर्व नगरसेवकांना समान म्हणजे २.५० लाख रुपयांप्रमाणे दिला जाणार आहे. याशिवाय चार प्रभाग समिती सभापतींना प्रत्येक चार लाख रुपयांचा निधी स्वतंत्रपणे दिला जाणार आहे. चारपैकी तीन प्रभाग समितींवर कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे सभापती आहेत. निधी वाटप करताना ताराराणी आघाडी व भाजप नगरसेवकांना कमी निधी कसा मिळेल, याचाच अधिक विचार केलेला आहे. त्यामुळे सत्तारूढ आणि विरोधक यांच्यात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी) ++४ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या स्मारकासाठी २० लाख रुपयांचा निधी राखून ठेवला आहे. कोल्हापूर शहराची हद्दवाढ होण्याची शक्यता गृहीत धरून जर ही गावे शहराच्या हद्दीत आलीच, तर त्यांना नागरी सुविधा देण्याकरिता दोन कोटींचा निधी राखून ठेवला आहे.