शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

वसाहतीचा विकास, समाजाची प्रगती हाच ध्यास--परिवर्तनाच्या वाटेवर

By admin | Updated: December 19, 2014 23:51 IST

पंचमंडळीचा निर्धार : पर्यटनासाठी परदेशवारीची तयारीं; महिलाही संघटित; १४ महिला बचत गटांची स्थापना--पारधी समाज

भीमगोंडा देसाई - कोल्हापूरव्यसने सुटली, संस्कार रुजू लागले की कोणतेही घर अथवा समाज आपोआपच विकासाच्या वाटेवर जातो. उचगाव येथील फासेपारधी वसाहतीचेही तसेच झाले. समाजातील नागरिकांना व्यसनापासून परावृत्त करताना, स्वच्छता मोहीम राबविताना वसाहतीचा नियोजनबद्ध विकास करणे, समाजबांधवाना शिक्षणाची गोडी लावत त्यांची आर्थिक उन्नती साधणे हेच उद्दिष्ट गणेश काळे यांच्यासह पंचमंडळींनी समोर ठेवले होते. किंबहुना त्याचा ध्यासच घेतला होता. त्याचेच फलित आज दिसत आहे. गावापासून दोन किलोमीटरवर असलेल्या बारा एकर जागेत फासेपारधी वसाहतीमध्ये नियोजनबद्ध विकासकामे केली जात आहेत. शासनाकडून आलेल्या निधीचा पारदर्शकपणे वापर करून श्रमदानाची जोड देत सर्वच कामे केली जातात. उच्चवर्णीय वसाहतीमधील लोकांना हेवा वाटावा, असा विकासाचा ‘चेहरा’ दिला आहे. (समाप्त)वर्दळ वाढली‘लोकमत’ने या वसाहतीवर प्रकाशझोत टाकल्यानंतर रोज कोल्हापूर व पंचक्रोशीतील दहा ते बारा लोक आमच्या वसाहतीला भेट देत आहेत. विविध उपक्रमांची माहिती जाणून घेत आहेत. उद्या, शनिवारी टेंबलाईवाडीतील प्रियदर्शनी कॉलनीतील लोक येणार आहेत. - आप्पाजी पोवार, रहिवासीआदर्शवत कामगिरी...ग्रामपंचायतीतर्फे फासेपारधी वसाहतीच्या विकासासाठी कायमच सहकार्याची भूमिका राहिली आहे. वसाहतीमध्ये एकजूट असल्यामुळे सर्वच योजना चांगल्या राबविल्या जातात. लोकसहभागातून त्यांनी वसाहतीचा कायापालट केला आहे. वसाहतीमधील चांगल्या विकासकामांमुळे गावाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. वसाहतीचा सर्वांनीच आदर्श घेण्याची गरज आहे.- सौ. सुरेखा चौगुले, सरपंच, उचगावमहिला संघटित..वसाहतीमध्ये १४ महिला बचतगट कार्यरत आहेत. या माध्यमातून १७० महिला संघटित आहेत. २० ते ३० लाख रुपयांचे भागभांडवल बचत करून संकलित केले आहे. बचतगटातर्फे वसाहतीमध्ये मोठे किराणा व अन्य वस्तूंचे दुकान घालण्याची तयारी सुरू आहे.