शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘देवचंद’च्या विद्यार्थ्यांनी थांबवले चिकोत्राचे प्रदूषण

By admin | Updated: January 28, 2015 01:00 IST

वनराई बंधारे बांधले : खडकेवाड्यातील सांडपाणी थांबवले

म्हाकवे : विद्यार्थ्यांना कामाची सवय व्हावी, त्यांच्यावर सुसंस्कार व्हावेत, तसेच या युवा शक्तीच्या माध्यमातून समाजोपयोगी आणि विधायक कामे व्हावीत, यासाठी निपाणीतील देवचंद कॉलेजच्या एनएसएस विभागाने खडकेवाडा (ता. कागल) येथे श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी खडकेवाड्यातील सर्व सांडपाणी थेट नदीपात्रात मिसळण्यापासून रोखण्यासाठी ओढ्याला ठिकठिकाणी वनराई बंधारे घातले आणि नदीप्रदूषण थांबवले. खडकेवाडा गावचे सर्व सांडपाणी एका मोठ्या ओढ्याद्वारे चिकोत्रा नदीला मिसळते. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या नदीकाठावरील जॅकवेलला लागूनच हा ओढा वाहतो. याचा विचार होऊन शिबिराचे प्रकल्पाधिकारी प्रा. डॉ. विजय गायकवाड, सरपंच सुवर्णा जाधव, उपसरपंच आप्पासाहेब पोवार, माजी सरपंच जयसिंगराव जाधव, ग्रामसेवक एन. के. कुंभार यांनी शिबिरार्थी विद्यार्थ्यांबरोबर काम करून या ओढ्यावर वनराई बंधारे बांधले. त्यासाठी नदीतील वाळू पोत्यात भरून त्याचा वापर केला.दरम्यान, या ओढ्यावर घालण्यात आलेले हे बंधारे अतिशय मजबूत बांधण्यात आले आहेत. याचा उपयोग ग्रामस्थांना भविष्यात अनेक वर्षांसाठी होणार आहे. या कामाची नोंद घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, गटविकास अधिकारी दीपक चव्हाण, प्राचार्य पी. एम. हेरेकर, आदींनी पाहणी करून विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. कृषी सहायक संदीप कांबळे यांनीही याकामात प्रत्यक्ष सहभागी होऊन कामाचा दर्जा वाढवला.