शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

देवस्थानने दिली सामाजिक संस्थांना साखर

By admin | Updated: June 18, 2015 00:36 IST

‘लोकमत’च्या छायावृत्ताची दखल : गेले कित्येक दिवस पाचशे किलो साखर वापराविना--लोकमतचा प्रभाव

कोल्हापूर : कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर परिसरातील खासगी सुरक्षारक्षकांच्या केबीनमध्ये ठेवण्यात आलेली ५०० किलो साखर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने बालकल्याण संकुल व पाचगावमधील छत्रपती शाहू शैक्षणिक आश्रम या दोन संस्थांना दिली. वापराविना गेले कित्येक दिवस या साखरेची पोती पडून असल्याचे छायाचित्र बुधवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्याची तातडीने दखल घेत देवस्थानने हे पाऊल उचलले. भक्तांमध्येही या वृत्ताची चर्चा दिवसभर सुरू होती.अंबाबाईच्या दर्शनासाठी दररोज देशभरातून हजारो भाविक येत असतात. या भाविकांना देण्यात येणारा लाडू प्रसाद देवस्थान समितीच्यावतीने तयार केला जातो. त्यामुळे भक्त आणि विविध साखर कारखान्यांकडून समितीला पोत्यांनी साखर येते. मात्र, तीन वर्षांपूर्वी समितीने लाडू प्रसादाचा ठेका महिला बचत गटाला दिला. त्यात देवस्थानच्या अन्नछत्राचा लाभ घेणाऱ्या भाविकांची संख्याही कमी असल्याने साखरेचा वापर होत नाही. त्यावर पर्याय म्हणून जास्तीची साखर बालकल्याण संकुलासह शहरातील सेवाभावी संस्थांना दिली जाते. खासगी सुरक्षारक्षकांच्या केबीनमधील साखर गेल्या चार-पाच महिन्यांतील असल्याची माहिती अंबाबाई मंदिराचे व्यवस्थापक धनाजी जाधव यांनी दिली. तसेच एकूण ५०० किलो साखरेपैकी २५० किलो साखर बालकल्याण संकुलला व २५० किलो साखर पाचगावच्या छत्रपती शाहू शैक्षणिक आश्रमाला दिली असल्याचे सांगितले. बालकल्याण संकुलाच्या कार्यवाह पद्मजा तिवले यांनी साखर अजूनही चांगली असल्याची माहिती दिली. (प्रतिनिधी)