शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

कुंभोजमध्ये दारूबंदीचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 00:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककुंभोज : स्वातंत्र्यदिनी कुंभोज (ता. हातकणंगले) येथे ग्रामसभेदरम्यान बैठकीच्या नियोजनाचा अभाव, तसेच महिला सदस्यांच्या सभास्थानाच्या अनुपस्थितीमुळे सभेला गोंधळाचे स्वरूप प्राप्त झाले. परिणामी, गावात उभी बाटली आडवी करण्यासाठी दारूबंदी लढ्यातील उपस्थित अग्रणी महिलांसह नागरिकांतून कमालीची नाराजी व्यक्त झाली. सभेदरम्यान गावात संपूर्ण दारूबंदी करण्याचा एकमुखी निर्धार करून मतदान घेण्याचा ठरावही ...

लोकमत न्यूज नेटवर्ककुंभोज : स्वातंत्र्यदिनी कुंभोज (ता. हातकणंगले) येथे ग्रामसभेदरम्यान बैठकीच्या नियोजनाचा अभाव, तसेच महिला सदस्यांच्या सभास्थानाच्या अनुपस्थितीमुळे सभेला गोंधळाचे स्वरूप प्राप्त झाले. परिणामी, गावात उभी बाटली आडवी करण्यासाठी दारूबंदी लढ्यातील उपस्थित अग्रणी महिलांसह नागरिकांतून कमालीची नाराजी व्यक्त झाली. सभेदरम्यान गावात संपूर्ण दारूबंदी करण्याचा एकमुखी निर्धार करून मतदान घेण्याचा ठरावही करण्यात आला. या विषयावरील चर्चेवेळी सरपंचांची अनुपस्थिती मात्र उपस्थितांना खटकली.महिन्याभरापासून गावात दारूबंदी लढ्याची मशाल हाती घेतलेल्या महिलांनी १५ आॅगस्टला होणाºया ग्रामसभेत गावात संपूर्ण दारूबंदी करण्याबाबतची ग्रामपंचायतीकडे मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर लढ्यातील रणरागिनी तसेच लढ्यास समर्थन देणाºया नागरिकांची उपस्थिती मोठी होती.ग्रामपंचायतीत महिला सदस्यांचे संख्याबळ आठ आहे. ग्रामपंचायतीत महिलाराज असल्याने उभी बाटली आडवी करण्याच्या ठरावासह पाठबळ मिळविण्याच्या उद्देशाने दारूबंदी लढ्यातील कार्यकर्त्यांची सभेस कधी नव्हे इतकी उपस्थिती होती. तथापि, गोंधळाच्या कारणावरून सरपंच सभा पूर्ण होईपर्यंत सभास्थानी थांबल्या नाहीत. याशिवाय महिला सदस्यांची सभा ठिकाणी राहिलेल्या अनुपस्थितीमुळे नागरिकांत उघडपणे नाराजी व्यक्त झाल्याने या कारणावरून बराच वेळ गोंधळ उडाला.बैठकीच्या ठिकाणाबरोबरच सभा चालविण्यातही नियोजनाचा अभाव राहिल्याने ग्रामसभेत वारंवार गोंधळ माजला. शिवाय प्रश्न अथवा सूचना मांडणाºया नागरिकांनी शिस्त न पाळल्यानेही गोंधळात अधिकच भर पडली. आयत्यावेळी उपस्थित झालेल्या वैयक्तिक पातळीवरील प्रश्नांमुळे ग्रा. पं. पदाधिकारी हैराण बनले. अशा वातावरणात माजी सरपंच किरण नामे, कमल सुवासे यांनी दारूबंदीबाबत कृती समिती गठीत करण्याची मागणी केली. सभेदरम्यान उभी बाटली आडवी करणे, तसेच त्याबाबत पाठपुरावा करण्याचा अधिकार कृती समितीला देणे, पाणंद रस्त्यांची डागडुजी करणे, शाहूनगर, शिवाजीनगर येथील अतिक्रमणे कायम करणे, रयत गुरुकुल शाळेमागील पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण हटविणे, स्टँड परिसरातील अतिक्रमणे हटविणे, आदी ठराव सभेदरम्यान करण्यात आले.सभेस उपसरपंच अभिजित जाधव, ग्रा. पं. सदस्य कलगोंडा पाटील, सुकुमार पाटील, जहाँगीर हजरत, विपुल चौगुले, सागर कांदेकर, सप्रेम मासुर्ले, नंदकुमार माळी, अनिल कोरे, अजित गोपुडगे, ग्रामविकास अधिकारी आर. सी. पाटील, विजय नामे, भारत जमणे, दारूबंदी लढ्यातील कमल सुवासे, रूपाली घाटगे, शोभा सनदे, मीना सकटे, सुमन भोरे, सागर सुवासे, अविनाश घाटगे, विशाल घाटगे, विशाल लोंढे, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.