शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

देवस्थानच्या जमिनी कसणारे हक्कापासून वंचित

By admin | Updated: July 18, 2014 00:27 IST

संतराम पाटील-केनवडेकर : 'कसेल त्याची जमीन' कायद्याच्या अंमलबजावणीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

म्हाकवे : पिढ्यान्पिढ्या देवस्थानची जमीन कसून त्यावर उपजीविका करणारे राज्यातील शेतकरी कुटुंबे मात्र अद्याप त्या जमिनीच्या मालकी हक्कांपासून वंचितच आहेत. तब्बल ६४ वर्षांपूर्वी देशात ‘कसेल त्याची जमीन’, हा महत्त्वपूर्ण कायदा होऊनही राज्यातील सुमारे दहा लाख शेतकरी या कायद्याच्या अंमलबजावणीकडे आजही डोळे लावून बसले आहेत. राज्यात सुमारे पाच लाख हेक्टर इतकी देवस्थानची जमीन संबंधित शेतकऱ्यांच्या मालकी हक्कात न आल्याने अविकसितच राहिली आहे. याबाबत किसान सभेने वारंवार आंदोलने, मोर्चे, मेळावे घेऊन शासन दरबारी लढा दिला आहे. मात्र, लोकप्रतिनिधींनी याकडे कानाडोळाच केला आहे.१९५० मध्ये भारत सरकारने कृषक दिन साजरा करीत ‘कसेल त्याची जमीन व कसेल तितका काळ जमीन’ या धोरणाची अंमलबजावणी केली. तसेच या वर्षभरात शेतीविषयक अनेक कायदेही संमत केले. देवस्थानच्या जमिनी कसणारे शेतकरी वगळता अनेक शेतकऱ्यांना या कायद्याचा लाभ झाला. कूळ वहिवाटीचा कायदा देवस्थानची जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लागू न केल्याने या शेतकऱ्यांची अवस्था वेठबिगारीच्याही पलीकडे झाली आहे. त्यामुळे अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने या शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून सरकारशी चिवट झुंज दिली जात आहे.मोठ्या प्रमाणात असणाऱ्या या जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर रितसर सात-बारा पत्रकी नोंद न झाल्याने या शेतीवर संबंधित शेतकऱ्यांना पाणी योजना करणे, विहीर खुदाई, जमीन विकास, कर्ज मिळणे यांसह जमिनीच्या नैसर्गिक आपत्तीवेळी नुकसानभरपाई मिळणे, पूरग्रस्त काळात खंड माफ होणे, आदी शासकीय मदतही मिळणे कठीण आहे. तसेच ही शेती पारंपरिक पद्घतीनेच केल्याने हे शेतकरी अन्नधान्य निर्मितीमध्ये मागे पडत असून, यामुळे राज्याचे उत्पादनातही घट होत आहे. शासनदरबारी नोंद असलेल्या १७ हजार १६८ देवस्थानांकडे सुमारे ५ लाख ५८ हजार ४३७ एकर जमीन आहे, तर नोंद न झालेली गावस्की देवस्थान, खासगी देवस्थान, ट्रस्ट अनुषंगिक देवस्थान समितीच्या लाखो एकर जमिनी आहेत. या सर्व जमिनींवर दहा लाखांहून अधिक शेतकरी (कुळे) आपला उदरनिर्वाह करतात.किसान सभेने दिलेल्या लढ्यामुळे पश्चिम बंगालमधील १३ लाख हेक्टर जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालकीची केली. यामुळे हे राज्य भात उत्पादनात देशात अव्वल दर्जाचे ठरले आहे. (वार्ताहर)कोल्हापुरात उद्या राज्यव्यापी मेळावादेवस्थानच्या जमिनी मालकीच्या व्हाव्यात यासाठी कोल्हापूरसह सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आदी पश्चिम महाराष्ट्रातीलच शेतकरी लढा देत होते. त्यामुळे त्याला मर्यादा येत होत्या; परंतु आता संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांनी या लढ्यात उडी घेतल्याने लढ्याची व्यापकता वाढली आहे. त्यादृष्टीने कोल्हापूर येथे शाहू स्मारक भवनमध्ये शनिवारी (दि. १९) निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र देवस्थान जमीनधारक समितीचे अध्यक्ष कॉ. संतराम पाटील-केनवडेकर यांनी दिली.