शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात डेंग्यूचे सावट

By admin | Updated: October 29, 2014 00:44 IST

प्रशासन सज्ज : आतापर्यंत ३२ रुग्ण, सीपीआर’च्या शिकाऊ डॉक्टरलाच लागण

कोल्हापूर : येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामधील (सीपीआर) शिकाऊ डॉक्टराला डेंग्यूची लागण झाल्याचे समजते. सध्या या डॉक्टरला डिस्चार्ज देण्यात आला आहे; पण त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सीपीआरमध्ये बोरिवडे (ता. पन्हाळा) व पाचुर्डे (ता. भुदरगड) येथील दोघांवर सध्या उपचार सुरू आहेत. मात्र, या दोघांना डेंग्यू नसल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने सांगितले. दरम्यान, डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, सीपीआर रुग्णालय व कोल्हापूर महापालिका प्रशासन सज्ज झाले असून, प्रशासनाने नागरिकांनी आजाराबाबत काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.‘सीपीआर’मध्ये डेंग्यूची लागण झालेले एप्रिल ते आज, मंगळवारअखेर ३२ रुग्ण होते. त्यापैकी ३० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या बोरिवडे व पाचुर्डे येथील दोन रुग्ण आहेत. हे दोघेही मुंबईचे रहिवासी असून पर्यटक आहेत. त्यांना त्याठिकाणी डेंग्यूची लागण झाल्याचे प्रशासनाने सांगितले.जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये आठवड्यामधून दोन दिवस जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग पाण्याच्या साठ्याची तपासणी करीत आहे. त्याचबरोबर एकात्मिक रोग सर्वेक्षण पथक (आयडीएसपी) तयार केले आहे. या पथकात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी अशा एकूण चौघाजणांचा समावेश आहे. हे पथक आरोग्य विभागावर सनियंत्रण ठेवते. (प्रतिनिधी)महापालिका सतर्कमहापालिकेच्या आरोग्य विभागामध्ये गेल्या सात ते आठ महिन्यांत डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह होता. सध्या शहरातील खासगी रुग्णालयात डेंग्यूसदृश रुग्ण आढळला तर महापालिकेला कळवावे, असे आवाहन आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी केले असून, महापालिका प्रशासन उपाययोजनेसाठी सतर्क असल्याचे सांगितले.डेंग्यू नाही; मात्र काळजी घ्या : महापालिकेचे आवाहनपावसाळ्यानंतर दूषित पाण्यापासून हिवताप, हत्तीरोग, डेंग्यू ताप, चिकनगुनिया यासारखे रोग पसरण्याचा धोका निर्माण होतो. राज्यभर हिवताप व डेंग्यूसदृश आजारांच्या रुग्णांत वाढ होत असतानाच कोल्हापुरातही असे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र शहरात डेंग्यूसदृश आजार नसल्याचा खुलासा महापालिका प्रशासनाने केला आहे. नागरिकांनी सावध राहून आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने पत्रकाद्वारे केले आहे.जिल्ह्यात मागील वर्षी याच कालावधीत हिवताप व डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले होते. औद्योगिकीकरणाच्या वाढीमुळे सुमारे एक लाखापेक्षा अधिक संख्येने जिल्ह्यात परराज्यातून मजूर आले आहेत. कर्नाटक, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, गोवा, आदी भागातील हिवतापग्रस्तांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे या परिसरात बराच कालावधी वास्तव्य करून आलेल्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज असते. शहरी भागातही डेंग्यूसदृश आजारांचा रुग्ण आढळल्यास तत्काळ आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधा. हिवताप रुग्णांची तपासणी महापालिकेच्या आरोग्य केंद्रात, तर डेंग्यूची तपासणी ‘सीपीआर’मध्ये करण्याची सोय आहे. याचा लाभ रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन आरोग्य अधिकाऱ्यांनी केले आहे.