शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

खराब रस्त्यांप्रश्नी ‘जनशक्ती’ची निदर्शने

By admin | Updated: December 29, 2014 23:35 IST

निदर्शने सुरू असताना कोणीही अधिकारी आंदोलकांसमोर यायला तयार नव्हते

कोल्हापूर : शहरातील खराब झालेले अंतर्गत रस्ते तातडीने दुरुस्त करावेत, खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करून देण्याची जबाबदारी ठेकेदारांवर सोपवावी, या मागणीसाठी आज, सोमवारी कोल्हापूर जनशक्ती संघटनेतर्फे महानगरपालिकेसमोर निदर्शने करण्यात आली. जनशक्तीचे कार्यकर्ते सकाळी साडेअकरा वाजता महानगरपालिकेसमोर जमले. त्यानंतर त्यांनी निदर्शने सुरू केली. निदर्शने सुरू असताना कोणीही अधिकारी आंदोलकांसमोर यायला तयार नव्हते, त्यामुळे आंदोलकांनी महापालिकेत घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना गेटवरच रोखले. थोड्या वेळाने नगरअभियंता नेत्रदीप सरनोबत, उपनगर अभियंता एम. एम. निर्मळे यांनी आंदोलकांसमोर जात त्यांचे म्हणणे ऐकून घेत निवेदनही स्वीकारले. शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे इंधन, गाड्यांचे, तसेच वेळेचे नुकसान होत आहे. खड्डे आणि धुुळीच्या साम्राज्यामुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. अनेक नागरिकांना मानेचा, पाठीच्या मणक्यांचा, तसेच डोळ्याचे, श्वसनाचे आजार झाले आहे. या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करता ज्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे, ती तातडीने करून घेण्यात यावीत, रस्त्यांच्या दर्जाकडे लक्ष देऊन रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदारांवर सोपवावी, ज्या रस्त्यांचा नूतनीकरणात समावेश झालेला नाही, त्यांना तातडीने निधी देऊन त्याच्या दुरुस्तीचे आदेश द्यावेत, अशा मागण्या संघटनेने निवेदनात केल्या आहेत. निदर्शनाचे नेतृत्व समीर नदाफ, अरुण अथणे, तय्यब मोमीन, केशव स्वामी, राजन पाटील, दिलीप पाटील, बाळासो शाळीबिद्रे, नियाज खान, मधुकर पाटील, नियाज कागदी, विवेक वोरा, संतोष आचरे, मुसाभाई पटवेगार, आदींनी केले. यावेळी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)