शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

दानवेंच्या वक्तव्याने जिल्ह्यात दाणादाण

By admin | Updated: May 12, 2017 00:27 IST

संतप्त पडसाद : प्रतीकात्मक पुतळा दहनासह काळे फासले; निषेधार्थ घोषणाबाजी; राजीनाम्याची मागणी

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जालना येथे बुधवारी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त आणि बेताल वक्तव्याचे संतप्त पडसाद आज, गुरुवारी जिल्ह्यात विविध ठिकाणी उमटले. शिवसेनेसह कॉँग्रेस, राष्ट्रवादी, शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केले. प्रतीकात्मक पुतळ्याला काळे फासत, दहन करीत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. काही ठिकाणी जोडा मारो आंदोलनही करण्यात आले. कोल्हापुरात शिवसेनेने फासले काळेलोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापुरात गुरुवारी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला शिवसेनेतर्फे काळे फासण्यात आले. मिरजकर तिकटी येथे शिवसैनिकांनी त्यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली.शिवसैनिकांनी दुपारी साडेबाराच्या सुमारास निदर्शनाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी ‘तूर शेतकऱ्यांच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’, ‘शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणाऱ्या दानवे यांचा धिक्कार असो’, अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यानंतर त्यांनी प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला काळे फासले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दानवे यांच्या बेताल वक्तव्याचा निषेध केला.शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, उपजिल्हा प्रमुख सुजित चव्हाण, शहरप्रमुख शिवाजीराव जाधव, दुर्गेश लिंग्रस, रवी चौगुले, अवधूत साळोखे, कमलाकर जगदाळे, हर्षल सुर्वे, दत्ताजी टिपुगडे, अनिल पाटील, दिलीप देसाई, अमोल पोवार, शशी बिडकर, शुभांगी पोवार आदी सहभागी झाले होते. दरम्यान, यावेळी काळे फासताना शिवसैनिक आणि पोलिसांत झटापट झाली.इचलकरंजीत जोडा मारो आंदोलनइचलकरंजी : इचलकरंजी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ रावसाहेब दानवे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडा मारो आंदोलन करून जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी पुतळा काढून घेताना पोलीस व आंदोलक यांच्यात झटापट झाली. यावेळी शेतकऱ्यांबद्दल बेताल वक्तव्ये करून त्यांचा अवमान केल्याबद्दल दानवे यांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास जोडा मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, महादेव गौड, मधुकर पाटील, बाबूराव पाटील, सयाजी चव्हाण, आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. ‘आप’कडूनही निषेधकोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या शेतकरी विरोधी वक्तव्याचा आम आदमी पक्षातर्फे (आप) गुरुवारी तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. दानवे यांनी त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी पक्षाने केली आहे. नारायण पोवार, संदीप देसाई, उत्तम पाटील, नाथाजी पोवार, आदींनी हे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.