शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

सहायक कामगार आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने

By admin | Updated: January 29, 2016 23:51 IST

यंत्रमाग कामगार संघटना : किमान वेतनाची मागणी

इचलकरंजी : यंत्रमाग कामगारांसाठी राज्य शासनाने जारी केलेल्या किमान वेतनाच्या अध्यादेशाला एक वर्ष होऊनही अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे शुक्रवारी सहायक कामगार आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली, तर लाल बावटा सायझिंंग-वार्पिंग कामगार संघटनेच्यावतीने प्रांत कार्यालयासमोर धरणे धरण्यात आले.२९ जानेवारी २०१५ रोजी उच्च न्यायालयाच्या आदेशाने राज्य शासनाकडून सुधारित किमान वेतन जाहीर करण्यात आले. त्याला मालक प्रतिनिधी संघटनांनी विरोध केला असला तरी न्यायालयाने अंमलबजावणीस स्थगिती दिलेली नाही. असे असताना किमान वेतनाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केली जात आहे. सुधारित किमान वेतन जाहीर झाल्यानंतरही त्यापेक्षा कमी वेतन दिलेल्या मालकांच्या विरोधात फरकाचे दावे दाखल केले आहेत. त्याची अद्याप सुनावणी सुरू करण्यात आलेली नाही, अशा मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. या मागण्यांची त्वरित अंमलबजावणी करावी, यासाठी शुक्रवारी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने सहायक कामगार आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करीत शासनाचा निषेध केला. आंदोलनात दत्ता माने, शामराव कुलकर्णी, राजेंद्र निकम, परशराम आगम, आनंदा गुरव, सुनील बारवाडे, शिवानंद पाटील, विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.तसेच लाल बावटा सायझ्ािंंग- वार्पिंग कामगार संघटनेच्यावतीने प्रांत कार्यालयासमोर धरणे धरले. यावेळी या मागण्या मान्य न झाल्यास संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी ए. बी. पाटील, आनंदराव चव्हाण, कृष्णात कुलकर्णी, मारुती जाधव, सूर्यकांत शेंडे, दशरथ जाधव, महादेव बरुर, आदींसह कामगार सहभागी झाले होते. (वार्ताहर)मुंबई येथे बैठकीत ‘आयटक’चा इशाराइचलकरंजी : यंत्रमाग कामगारांचे किमान वेतन, कल्याणकारी मंडळ, आदींसह सर्वच प्रश्नांकडे सध्याचे भाजप सरकार दुर्लक्ष करीत आहे. तरी आयटक कामगार संघटनेच्यावतीने राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय आयटक संघटनेच्या राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आयटकचे राज्य सचिव शाम काळे (नागपूर) होते.राज्यातील यंत्रमाग क्षेत्रामधील आयटक पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबई येथील रुपेश गुप्ता भवन येथे झाली. यावेळी सर्वच वक्त्यांनी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात यंत्रमाग क्षेत्रातील कामगारांचा मेळावा आयोजित करून राज्यव्यापी आंदोलन हाती घेण्याचा निर्णय घ्यावा, असे सूचित केले आणि त्याप्रमाणे ठराव मंजूर करण्यात आला. बैठकीमध्ये हणमंत लोहार, अशोक गोपलकर, विजय कांबळे, मक्सूद अन्सारी, फैय्याज अन्सारी, आदींनी आपले विचार मांडले.