कचरा उठावाबाबत शहरातील विविध भागातून वारंवार तक्रारी येतात. त्यामुळे कमी वेळेत व कामगारा विनाकचरा उचलण्यासाठी पुणे येथील एका कंपनीने संपूर्ण भारतीय बनावटीचे दोन-तीन प्रकारचे जटायू मशीन तयार केले आहेत. सदरचे मशीन डिझेलवर चालणारे हायड्रोलिक (हवेच्या दाबाने) मशीन आहे. पडलेल्या कचऱ्याला हात न लावता मशीनच्या सहाय्याने एका वेळेला ६०० किलोपर्यंत गोळा करता येते. सदरचे जटायू मशीन देशातील दिल्ली, उत्तराखंड, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक आदी १० राज्यात कार्यान्वित आहे. सदर कंपनीचे केतन नंदेश्वर, सुमेद भोज, अनमोल केटकाळे यांनी मशीनचे प्रात्यक्षिक विकली मार्केटसह इतर भागात दाखवले. यावेळी नगरसेवक शशांक बावचकर, प्रकाश मोरबाळे, आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार व अन्य अधिकारी उपस्थित होते.
२३ आयसीएच जटायू
(फोटो ओळी) इचलकरंजीत हवेच्या प्रेशरने कचरा गोळा करणाऱ्या जटायू मशीनचेे प्रात्यक्षिक घेण्यात आले.