पांडुरंग भांदिगरे यांनी आपल्या मतदारसंघातील मुख्य तसेच रहदारीच्या रस्त्यांवरील २४ गावांत प्रवाशांना निवारा मिळावा यासाठी गेल्या एक-दोन वर्षांपासून निवारा शेडची उभारणी केली आहे. त्याचा नागरिकांबरोबरच प्रवाशांनाही उपयोग होत आहे.
मात्र, गेल्या दहा-पंधरा दिवसांपासून अज्ञातांनी यापैकी सहा निवारा शेडची मोडतोड केली असून, त्यांच्या नावाच्या नेमप्लेटही काढून टाकल्या आहेत.
दरम्यान, मतदारसंघात सुरू असणाऱ्या विकासकामांच्या द्वेषातून काही विघ्नसंतोषी प्रवृत्तीच्या लोकांकडून निवारा शेडची मोडतोड व नासधूस सुरू असल्याने या प्रवृत्तीवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी कसबा तारळेचे सरपंच अशोक कांबळे, तारळे खुर्दचे सरपंच आनंदा पाटील, रोहित पाटील, संदीप पाटील, सचिन पाटील यांनी केली आहे.
सोबत १७ दुर्गमानवाड निवारा शेड
--
दुर्गमानवाड कुंभारवाडी फाट्यावरील निवारा शेडची अज्ञातांनी केलेली मोडतोड.