शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लज शहराची हद्दवाढ करा हद्दवाढ कृती समितीची मागणी : मुश्रीफांना घातले साकडे

By admin | Updated: May 11, 2014 00:21 IST

गडहिंग्लज : प्रलंबित गडहिंग्लज शहर हद्दवाढप्रश्नी व्यक्तिश: लक्ष घालून आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी हद्दवाढीला मंजुरी मिळवावी, अशी मागणी

गडहिंग्लज : प्रलंबित गडहिंग्लज शहर हद्दवाढप्रश्नी व्यक्तिश: लक्ष घालून आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी हद्दवाढीला मंजुरी मिळवावी, अशी मागणी गडहिंग्लज शहर हद्दवाढ कृती समितीतर्फे कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे. नगरपालिकेच्या कार्यक्रमानिमित्त मंत्री मुश्रीफ गडहिंग्लज दौर्‍यावर आले होते, त्यावेळी कृती समितीच्या शिष्टमंडळाने त्यांच्याकडे ही मागणी केली. निवेदनात म्हटले आहे की, शताब्दी वर्षातच नगरपालिकेने खास ठरावाद्वारे हद्दवाढीची मागणी केली आहे. दरम्यान, पाच-सहा वर्षे हा ठराव कार्यवाहीविना शासनदरबारी पडून होता. त्याच्या पाठपुराव्यासाठी कृती समितीची स्थापना झाली. स्व. बाबासाहेब कुपेकर यांच्या प्रयत्नामुळे शासनाकडून हद्दवाढीची घोषणा झाली. त्यानुसार नागरिकांनी पाठपुरावा केल्याने बड्याचीवाडी ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्याकडून हद्दवाढीची लेखी संमती देण्यात आली. दरम्यान, २७ वर्षे हद्दवाढीचा प्रस्ताव शासनस्तरावर प्रलंबित आहे. नजरचुकीने उद्घोषणेमध्ये २ सर्व्हे नंबरचा उल्लेख राहून गेल्यामुळे शासनाने सर्व कागदपत्रे जिल्हाधिकार्‍यांकडे परत पाठवली असून, हद्दवाढीची प्रक्रिया रद्द करून पुन्हा नव्याने संपूर्ण प्रक्रिया करण्याचा घाट घातल्याचे समजते. तथापि, नव्याने प्रक्रिया न राबविता जुन्या उद्घोषणेप्रमाणे हद्दवाढीचा प्रस्ताव मंजूर करावा, शासनाने आपल्या विशेष अधिकाराचा वापर करून ‘ते’ २ सर्व्हे नंबर वगळून हद्दवाढीची प्रक्रिया पूर्ण करावी, अशी आग्रही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. मुश्रीफ यांना भेटलेल्या शिष्टमंडळात कृती समितीचे अध्यक्ष डॉ. एम. एस. बेळगुद्री, कार्याध्यक्ष प्रा. शिवाजीराव होडगे, उपाध्यक्ष प्रा. अमृतराव देसाई, सचिव प्रा. एम. एस. मर्जे, पी. बी. आरबोळे, प्रा. आर. के. कोडोली, आर. आर. खोराटे, प्रा. एम. एस. शिंदे, व्ही. एम. बुगडीकट्टीकर, आर. एम. पटेल, आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)