शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या मृत्यूस जबाबदार घटकांवर कारवाईची मागणी

By admin | Updated: January 2, 2015 23:48 IST

या बाबींवर व्हावी चौकशी...

कोल्हापूर : रुईकर कॉलनीत घुसलेल्या बिबट्याला काल, गुरुवारी चुकीच्या पद्धतीने पकडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. त्यासाठी जबाबदार असलेल्या वन आणि पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी प्रजासत्ताक संस्थेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्याबाबतचा ई-मेल त्यांना पाठविला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई व सचिव बुरहान नाईकवडी यांनी पत्रकाद्वारे दिली. पत्रकात म्हटले आहे की, वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी व्यवस्थापन तत्त्वे जाहीर केली आहेत. त्यांचा अंमल होणे आवश्यक आहे. मात्र, रुईकर कॉलनीत काल चार तास पाठलाग आणि चुकीच्या पद्धतीने पकडल्यामुळे बिबट्याचा मृत्यू झाला. त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे.या बाबींवर व्हावी चौकशी...घटनास्थळी कोणते अधिकारी हजर होते? जे हजर नव्हते ते का याठिकाणी आले नाहीत? मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर, करवीर रेंजचे वनसंरक्षक निंबाळकर यांची भूमिका काय? बिबट्या व्यवस्थापनासाठीची तत्त्वे पाळली का? नसल्यास कोण जबाबदार? बिबट्याला जेरबंद करायचे आदेश कोणी दिले? त्यासाठी परवानगी घेतली का? जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कोठे होते? त्यांनी काय प्रयत्न केले? गर्दी हटविण्यास पोलीस का अपयशी ठरले? बिबट्याला पकडल्यानंतर त्याच्यावर वैद्यकीय उपचार का करण्यात आले नाहीत? त्याला तसेच का नेण्यात आले? बिबट्याच्या शवविच्छेदनात त्याच्या शरीरावरील जखमांची नोंद केली आहे का? त्याचे चित्रीकरण केले आहे का?