शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

‘मातोश्री’चा ५० हून अधिक गावांना लाभ लोकसंख्येचा निकष : ग्रा.पं. इमारती टप्प्याटप्प्याने बांधणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 00:02 IST

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या वतीने जाहीर केलेल्या बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंंचायत बांधणी योजनेचा कोल्हापूर जिल्ह्यातील ५० हून अधिक गावांना लाभ होणार आहे.

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या वतीने जाहीर केलेल्या बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंंचायत बांधणी योजनेचा कोल्हापूर जिल्ह्यातील ५० हून अधिक गावांना लाभ होणार आहे. या सर्व ग्रामपंचायतींच्या इमारती टप्प्याटप्प्याने बांधण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. प्रत्यक्षात कोल्हापूर जिल्ह्यातील ८० गावांना ग्रामपंचायतींच्या इमारती नाहीत. मात्र, यामध्ये दोन हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असणाºया ग्रामपंचायतींचा समावेश राहणार नाही.

स्वतंत्र कार्यालयीन इमारत नसलेल्या राज्यातील ग्रामपंचायतींसाठी बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना सुरू करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाचा लाभ लोकसंख्येने लहान, आर्थिकदृष्ट्या कमकुवत अथवा दुर्गम भागातील सुमारे ४ हजार २५२ ग्रामपंचायतींना मिळणार आहे.या योजनेनुसार स्वतंत्र इमारत नसलेल्या १००० पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना १२ लाख आणि १००० ते २००० पर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना १८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात येणार आहे.

या निधीपैकी ९० टक्के रक्कम राज्य शासनामार्फत मिळणार असून, १० टक्के रक्कम स्वनिधीतून उभारणे आवश्यक आहे.या ग्रामपंचायतींना सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावरही इमारत उभारता येणार आहे. तसेच २००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना स्वनिधीतून अथवा सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर इमारत उभारता येईल. सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील खालील गावांच्या ग्रामपंचायतींना इमारत नसल्याने यातील लोकसंख्येच्या निकषांचा विचार करून या योजनेसाठी शिफारस करता येणे शक्य बनणार आहे.ग्रामपंचायतींना कार्यालय नसलेली गावेपन्हाळा - आवळी, उंड्री, बाळोली, हरपवडे, तिरपणगगनबावडा- मार्गेवाडी, जर्गी, लोंघे, तिसंगी, खोकुर्लेचंदगड- कळसगादे, उत्साळी, पुंद्रा, नागनवाडी, नागवे, शिरगाव, कडलगे, होसूलगडहिंग्लज- नरेवाडी, तुपूरवाडी, कसबा नूल, इदरगुच्ची, शिप्पूर, आजराकरवीर- आडूर, पडवळवाडी, कांचनवाडी, कंदलगाव, कळंबे तर्फ कळे, भुयेकागल- शंकरवाडी, पिराचीवाडी, कसबा सांगाव, यमगे, हमीदवाडा, अर्जुनवाडा, शिंदेवाडी, नंद्याळ, बेनिक्रे,हातकणंगले- अतिग्रे, संभापूर, कुंभोजराधानगरी- धामोड, मजरे कासारवाडा, बुजवडे, मौजे कासारवाडा, ढेंगेवाडी, रामनवाडी, तारळे खुर्द, तळगाव, कुडुुत्री, सावर्दे वडाचीवाडी, तरसंबळे, कौलवभुदरगड- मडूर, गारगोटी, बामणे, पडखंबे, पाळ्याचा हुडा, चांदमवाडी, शिवडाव, शिंदेवाडी, न्हाव्याचीवाडी, मिणचे बुद्रुकआजरा- आवंडी, शेळप, पेद्रेवाडीशाहूवाडी- गेळवडे, शेंबवणे, परखंदळे, गोंडोली, खेडे, करुंगळे, कासार्डे, निळे, टेकोली, वरेवाडी, तुरुकवाडी, सावे, विरळे, मांजरे.