शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

‘स्वाभिमानी’ करणार ३३००ची मागणी-जयसिंगपूरला आज ऊस परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 01:17 IST

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची यंदाची पहिली उचल टनास ३३०० रुपये असण्याची शक्यता आहे. आज, शनिवारी जयसिंगपूर येथे होणाºया ऊस परिषदेत पहिल्या उचलीचा बार फुटणार आहे.

ठळक मुद्दे या हंगामातील अंतिम दर हुतात्मा कारखान्याने ३३५० दिला.यंदा बाजारात साखरेचा दर ३५०० रुपये क्विंटल आहे.गुरुवारी समितीच्या अध्यक्षांना पत्र देऊन तातडीने बैठक घेण्याची मागणी

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची यंदाची पहिली उचल टनास ३३०० रुपये असण्याची शक्यता आहे. आज, शनिवारी जयसिंगपूर येथे होणाºया ऊस परिषदेत पहिल्या उचलीचा बार फुटणार आहे. मागणी कितीही असली तरी खासदार राजू शेट्टी तडजोड कितीवर करतात आणि एफआरपीपेक्षा किती रक्कम जास्त द्यावी लागणार, ती एफआरपीसोबत की काही मुदतीनंतर द्यावी लागणार हाच कळीचा मुद्दा आहे. यंदाचा गळीत हंगाम एक नोव्हेंबरपासून सुरू होत आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी ऊस परिषदेच्या आधीही कारखानदारांसमवेत बैठक घेऊन चर्चा करायची तयारी दर्शवली होती; परंतु संघटना व कारखानदार यांना एकत्र आणण्यास कुणीच पुढाकार घेतला नाही. सरकार म्हणून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गतवर्षी ऊसदरात पुढाकार घेतला होता; परंतु यंदा शेट्टी भाजपावर देशभर फिरून टीकेचा भडिमार करीत असल्याने पालकमंत्र्यांनी या प्रश्नात अजून तरी लक्ष घातलेले नाही.

उलट पहिली उचल एफआरपीनुसार व अंतिम दर ७०:३० च्या फॉर्म्युल्यानुसार कारखाने देत असताना आंदोलनाची गरज नाही, असे सांगून टाकले आहे. त्यामुळे दोन्ही घटकांत चर्चाच होऊ शकलेली नाही. परिणामी, पहिल्या उचलीचा तिढा सुटल्यशिवाय स्वाभिमानी धुराडी पेटवू देणार नाही. त्यामुळे हंगाम सुरळीत व्हायला पहिला आठवडा जाणार आहे.गतवर्षी स्वाभिमानीने पहिली उचल ३२०० रुपये मागितली व एफआरपी आणि त्यासोबतच १७५ रुपये जादा देण्यावर तडजोड झाली. या हंगामातील अंतिम दर हुतात्मा कारखान्याने ३३५० दिला. याचा अर्थ स्वाभिमानीने मागणी केलेल्या उचलीपेक्षा हुतात्माने टनांस १५० रुपये जास्त दिले आहेत. यंदा बाजारात साखरेचा दर ३५०० रुपये क्विंटल आहे. गतवर्षीच्या तुलनेत दर चांगला असल्याने पहिली उचल वाढवून मागण्याचा संघटनेचा प्रयत्न आहे. रघुनाथदादा पाटील यांच्या संघटनेने टनास ३५०० रुपयांची मागणी केली आहे. त्यांची मागणी प्रतिवर्षीच सर्वांत जास्त असते.

मागच्या हंगामातील अंतिम दर अजून निश्चित झालेले नाहीत. काही कारखान्यांनी साखरेचा दर कमी दाखविल्याने ऊसदर नियंत्रण समितीच्या २० सप्टेंबरला झालेल्या बैठकीत संघटनेच्या नेत्यांनी त्यास आक्षेप घेतला होता. त्यावर साखर आयुक्त कार्यालयानेच साखर दराबाबत खात्री करावी, असे ठरल्याने त्या बैठकीत कारखान्यांच्या अंतिम दराचे प्रस्ताव मंजुरीसाठी आले नव्हते. ही बैठक हंगाम संपण्यापूर्वी घ्यावी असे ठरले होते; परंतु ती अजून झाली नसल्याने खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी समितीच्या अध्यक्षांना पत्र देऊन तातडीने बैठक घेण्याची मागणी केली.दृष्टिक्षेपात हंगामसन २०१७-१८ या गाळप हंगामात अंदाजे नऊ लाख हेक्टर उसाची लागवड असून, ७२२ लाख टन ऊस उत्पादन अपेक्षित आहे, तर ७३.४ लाख टन साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे. सन २०१६-१७ च्या गाळपाच्या तुलनेत सन २०१७-१८ मध्ये ९४ टक्के वाढ अपेक्षित आहे. या हंगामात राज्यात १७० कारखाने सुरू होणार असल्याची माहिती मंत्री समितीने दिली आहे. यंदा परतीचा पाऊस सगळीकडे आॅक्टोबर अखेरपर्यंत झाल्यामुळे ऊस पिकास तो पोषक ठरला आहे. त्यामुळेही उत्पादन वाढणार आहे.साखरेचे संभाव्य मूल्यांकन असे :बाजारातील साखरेचा क्विंटलचा दर रु. ३५००त्याच्या ८५ टक्के रक्कम राज्य बँकेकडून उपलब्ध : २९७५त्यातून एफआरपीसह विविध कर्जांच्या व्याजापोटी ५०० रुपये कपातकारखान्यांना अनुषंगिक कामासाठी टनास २५० रुपये देणारनिव्वळ उसासाठी उपलब्ध : २२२५ रुपयेकोल्हापूर जिल्ह्णातील सरासरी एफआरपी : २८०० रुपयेज्या कारखान्यांचे कर्ज कमी आहे त्यांच्या व्याजापोटी ३०० रुपये गेल्यास ऊस बिलासाठी २०० रुपये जादा उपलब्धही रक्कम दहा उताºयाची आहे. हंगाम पुढे जाईल तसा उतारा वाढेल तेव्हा ही रक्कम वाढू शकते.