शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

दिल्ली रिटर्न --- देवयानी जोशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 00:35 IST

एन.सी.सी. हे क्षेत्र म्हणजे जवळपास ७० टक्के आर्मीच. आर्मीमधील लोकांचे दैनंदिन जीवन त्यांना मिळणारे ट्रेनिंग या सगळ्यांचा थोडक्यात मिळणारा अनुभव म्हणजे एन. सी. सी./ रायफल हातात घेऊन फायरिंग करायला मिळणे यासारखे सुख दुसरीकडे कुठेच नाही

ठळक मुद्देएन.सी.सी. नक्कीच माझ्या आयुष्यातील एक र्टनिंग पॉर्इंट ठरला आहे.दिल्लीमध्ये असताना मोठमोठ्या आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आॅफिसर्सच्या सहवासात असणे, त्यांच्यामध्ये वावरणे, मोठमोठ्या पार्टीज अटेंड करणे, हे सर्व अक्षरश: आनंद देणारे होते.

एन.सी.सी. हे क्षेत्र म्हणजे जवळपास ७० टक्के आर्मीच. आर्मीमधील लोकांचे दैनंदिन जीवन त्यांना मिळणारे ट्रेनिंग या सगळ्यांचा थोडक्यात मिळणारा अनुभव म्हणजे एन. सी. सी./ रायफल हातात घेऊन फायरिंग करायला मिळणे यासारखे सुख दुसरीकडे कुठेच नाही! एनसीसीच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या विविध कॅम्प्समध्ये विविध प्रकारचे ट्रेनिंग दिले जाते. त्यामध्ये आॅब्स्ट्रॅकल ट्रेनिंग, ०.२२च्या रायफलने फायरिंग, मॅप रिडिंग, टेंट पीचिंग (तंबू ७ मिनिटांमध्ये उभारणे) यासारख्या अनेक गोष्टी शिकायला मिळतात. त्याचप्रमाणे सैन्यातील लोकांचे राहणीमान, त्यांच्यातील शिस्त, एन.सी.सी. छात्रांच्याही अंगवळणी पडते.

दिल्ली रीटर्न होणे ही एनसीसीमधील सर्वांत मानाची गोष्ट आहे. प्रजासत्ताक दिन शिबिर हा एनसीसीमधील सर्र्वाेच्च मानला जाणारा कॅम्प करणे, हे सातवी- आठवीपासून उराशी बाळगलेलं माझं स्वप्न महाविद्यालयीन काळात मी पूर्ण केलं. त्या कॅम्पसाठी असणारी अतिशय अवघड निवड प्रक्रिया तसेच कॅम्पमध्ये असलेल्या प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत, पुढच्या कॅम्पमध्ये आपली निवड होईल की नाही, अशी भीती मनात ठेवून तसेच आपल्याला दिल्ली गाठायचीच ही जिद्द मनात असताना अखेर दिल्लीच्या ट्रेनमध्ये बसल्याचा आनंद शब्दांत व्यक्त करणे कठीणच!

दिल्लीत मिळालेल्या सुखसोयी तिथे गेल्यावर मिळालेला मान आणि तिथला एकूणच अनुभव पाहून आपण केलेल्या कष्टाचे सार्थक झाले अशी भावना मनात आली. देशातील सर्वांत महत्त्वाच्या व्यक्तींना राष्ट्रपतींपासून सैन्यातील तिन्ही दलांच्या प्रमुखांना भेटणे तसेच पंतप्रधानांच्या घरी जाऊन त्यांना भेटण्याची संधी फक्त एनसीसीमुळेच मला मिळाली. या सगळ्या कॅम्पमुळे अंगवळणी पडलेली शिस्त, कोणत्याही परिस्थितीशी जुळवूनच घेण्याची तयारी, आत्मविश्वास हे सर्व एनसीसीमुळेच शक्य झाले. करियरच्या दृष्टिकोनातून एनसीसीचा मिळणारा फायदा तर आहेच, पण तो युनिफॉर्म घातल्यावर लोकांचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. आरडीसी ही सगळ्यात अ‍ॅचिव्हमेंट केल्यानंतर अनुभवण्यास आलेले कौतुक, मिळालेला मान, लोकांच्या वाढलेल्या अपेक्षा आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट आई-वडिलांच्या डोळ्यातील अभिमानास्पद भाव आणि आनंदाचे अश्रू! यापेक्षा मोठी अ‍ॅचिव्हमेंट एका विद्यार्थ्याच्या आयुष्यात असूच शकत नाही.दिल्लीमध्ये असताना मोठमोठ्या आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आॅफिसर्सच्या सहवासात असणे, त्यांच्यामध्ये वावरणे, मोठमोठ्या पार्टीज अटेंड करणे, हे सर्व अक्षरश: आनंद देणारे होते.   Beating the Retreat हा कार्यक्रम तसेच आर्मी परेड बघण्याची संधी मला मिळाली, ही एक भाग्याचीच गोष्ट म्हणावी लागेल. आणि नॅशनल लेव्हलवर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केल्यानंतर मुंबईमध्ये आल्यावर झालेले स्वागतही अतिशय सुखद होते. त्यानंतर राज्यपालांच्या घरी आणि मुख्यमंत्र्यांच्या घरी जेवणाचे निमंत्रण मिळणे यासारखे भाग्य फार कमी लोकांच्या वाट्याला येते.

या सर्व प्रवासामध्ये मला वेळोवेळी आई-वडिलांनी, माझ्या शिक्षकांनी आणि मित्र-मैत्रिणींनी प्रोत्साहन दिले. मी विवेकानंद महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून माझ्या महाविद्यालयाचे एनसीसी हे ‘टायगर एनसीसी’ म्हणून ओळखले जाते. यावर्षी दिल्ली परेडला जाणारी मी कोल्हापूरमधील तसेच माझ्या ६ महाराष्ट्र गर्ल्स बटालियनमधील एकमेव मुलगी होते. म्हणून माझे विशेष कौतुक करण्यात आले आणि आतापासून भविष्यातील एक आॅफिसर अशीच ओळख मला मिळते. या अपेक्षांना खरी उतरणं एक आर्मी आॅफिसर होण्याचे माझं स्वप्न पूर्ण करण्याकडे माझी वाटचाल सुरू आहे. एन.सी.सी.ने देशाप्रती असलेले प्रेम वाढते, तसेच भारतीय सैन्याबद्दल आदराची भावना आणि आपुलकी मनात निर्माण होते. एन.सी.सी. नक्कीच माझ्या आयुष्यातील एक र्टनिंग पॉर्इंट ठरला आहे.- देवयानी जोशी(२०१९ राजपथ संचलनासाठीनिवड झालेली कोल्हापुरातील एकमेव विद्यार्थिनी)

टॅग्स :delhiदिल्ली