शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लज शहरातील अनधिकृत डिजीटल बोर्ड हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:22 IST

गडहिंग्लज : प्लास्टिक बंदीपाठोपाठ शहर डिजीटल फलकमुक्त करण्याची मोहीम पालिकेने हाती घेतली आहे. त्यानुसार आज, मंगळवारी शहरातील विविध ठिकाणी ...

गडहिंग्लज : प्लास्टिक बंदीपाठोपाठ शहर डिजीटल फलकमुक्त करण्याची मोहीम पालिकेने हाती घेतली आहे. त्यानुसार आज, मंगळवारी शहरातील विविध ठिकाणी अनधिकृतपणे लावलेले १६ मोठे डिजीटल फलक हटविण्यात आले. नगरपालिकेच्या इमारतीसह काही खासगी इमारतींवर जाहिरातीसाठी डिजीटल फलक लावण्यास रितसर परवानगी देण्यात आली आहे. ती ठिकाणेवगळता अन्य ठिकाणी डिजीटल फलक लावण्यासाठी पालिकेच्या पूर्वपरवानगीची गरज आहे.

परंतु, बसस्थानकासमोरील दसरा चौक, आजरा रोड, कडगाव रोड, चर्च रोड, संकेश्वर रोड या परिसरात अनेक ठिकाणी काही शैक्षणिक व सहकारी संस्था, खासगी क्लासेस व जीमचालकांनी मोठ-मोठे डिजीटल फलक अनधिकृतरित्या लावले होते. अनधिकृतरित्या लावण्यात आलेल्या डिजीटल फलकांमुळे शहराच्या सौंदर्याला बाधा येत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने अनधिकृत फलक हटविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ही कारवाई सुरू आहे. मोठ्या फलकांशिवाय आणखी काही लहान आकाराचे फलक ठिकठिकाणी लावले आहेत. तेही येत्या दोन दिवसांत हटविण्यात येणार आहेत. या मोहिमेत अतिक्रमण विभागप्रमुख रवींद्र जाधव, शामराव वडर, सौरभ लाखे, आकाश सोनटक्के, प्रल्हाद लाखे व निखिल बारामती आदींसह कर्मचारी सहभागी झाले होते.

------------------------------------------

फोटो ओळी : गडहिंग्लज नगरपालिकेने मंगळवारी शहरातील अनधिकृत डिजीटल फलक हटविले. (किल्लेदार फोटो)

क्रमांक : २२१२२०२०-गड-०८