शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन हटवा, व्यापाऱ्यांना वाचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : अनलॉकमध्ये सरसकट सर्वच दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी मिळावी, या मागणीसाठी बुधवारी शहर आणि उपनगरांतील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : अनलॉकमध्ये सरसकट सर्वच दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी मिळावी, या मागणीसाठी बुधवारी शहर आणि उपनगरांतील व्यापाऱ्यांनी ‘लॉकडाऊन हटवा, व्यापाऱ्यांना वाचावा’ यासह विविध मागण्यांचे फलक हातात घेऊन लक्ष वेधले. दुकानदारांनी सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत दुकाने बंद ठेवून आंदोलनात सहभाग घेतला. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजच्या पुढाकाराने आंदोलन झाले.

अत्यावश्यक सेवेची आणि वस्तूंची दुकाने वगळता इतर दुकाने सुरू करण्यास अजूनही सरकारने परवानगी दिलेली नाही. याविरोधात व्यापाऱ्यांत नाराजी आहे. शहरातील सर्वच व्यवसाय, दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांची आहे. या मागण्यांसंबंधीचे फलक हातात घेऊन भाऊसिंगजी रोड, गुजरी, महाद्वार रोड, पापाची तिकटी, पानलाईन, बाजार गेट, शिवाजी मार्केट, शाहूपुरी, धान्य लाईन, पार्वती टॉकीज चौक, बागल चौक, महापालिका चौक, लक्ष्मी रोड, सुभाष रोड, बिंदू चौक, आराम कॉर्नर, शिवाजी चौक, राजारामपुरी मेन रोड अशा शहरातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील एक हजार ते १२०० व्यापाऱ्यांनी लक्ष वेधले. आपल्या दुकानाच्या दारात फलक हातात घेत कोणत्याही घोषणा न देता लॉकडाऊन हटवून सरसकट सर्व व्यापार करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली. शिवाजी रोडवरील भांडी व्यापाऱ्यांनी हातात मागण्यांचे फलक घेऊन मानवी साखळी केली होती. राजारामपुरी येथे चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी व व्यापाऱ्यांनी दुकानासमोरच मानवी साखळी केली होती.

चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार, संजय पाटील, मानद सचिव धनंजय दुग्गे, जयेश ओसवाल, वैभव सावर्डेकर, राजू पाटील, खजिनदार हरीभाई पटेल, माजी अध्यक्ष आनंद माने, प्रदीप कापडिया, संचालक अजित कोठारी, प्रशांत शिंदे, संपत पाटील, राहुल नष्टे, भरत ओसवाल, माजी नगरसेवक तौफीक मुल्लाणी, संभाजीराव पोवार, कुलदीप गायकवाड, जुगल माहेश्वरी, विक्रम निसार, सुधीर आगरवाल यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. दरम्यान, मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना देण्यात आले.

--------------

चौकट

सर्वच असोसिएशनचा पाठिंबा

दि कोल्हापूर ग्रेन मर्चंटस् असोसिएशन, सराफ व्यापारी संघ, कापड व्यापारी संघ, किराणा भुसार व्यापारी असोसिएशन, जिल्हा लॉरी ऑपरेटर्स असोसिएशन, दि शाहूपुरी मर्चंटस् असोसिएशन, डिस्ट्रिक्ट वाईन मर्चंटस् असोसिएशन, डिस्ट्रिक्ट केमिस्टस् असोसिएशन, चुडी मर्चंटस् असोसिएशन, ऑईल मिल्स असोसिएशन, जिल्हा टिंबर व्यापारी व लघु औद्योगिक संघ, राजारामपुरी व्यापारी असोसिएशन, ऑटोमोबाईल्स डिलर्स असोसिएशन, प्लायवूड डिलर्स असोसिएशन, जिल्हा फुटवेअर्स असोसिएशन, स्टोन ट्रेडर्स असोसिएशन, कांदा-बटाटा व्यापारी असोसिएशन, दि कोल्हापूर ग्रेन कॅन्व्हासिंग एजंट असोसिएशन, कॉम्प्युटर असोसिएशन ऑफ कोल्हापूर, आय. टी. असोसिएशन ऑफ कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्र परिसर राईस मिल ओनर्स असोसिएशन, राईस मिल ओनर्स असोसिएशन, डिस्ट्रिक्ट स्पेअर पार्टस् अँड ऑटोमोबाईल्स डिलर्स असोसिएशन, कोल्हापूर रेडिओ इलेक्ट्रॉनिक्स डिलर्स असोसिएशन, गुडस् ट्रान्सपोर्ट असोसिएशन, कोल्हापूर-कराड-सांगली शुगर मर्चंटस् असोसिएशन, असोसिएशन ऑफ कॉम्प्युटर ट्रेनर्स, कोल्हापूर जिल्हा सराफ संघ, दि कन्झ्युमर्स प्रोडक्टस् डिस्ट्रिब्यूटर्स वेलफेअर असोसिएशन, असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस् अँड इंजिनिअर्स, कोल्हापूर जिल्हा पानपट्टी असोसिएशन, रेडिमेड गारमेंट डिलर्स असोसिएशन, कोल्हापूर स्टेशनरी कटलरी असोसिएशन या संघटनांनी आंदोलनात सहभाग घेतला.