शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

‘आयआरबी’च्या केबिन्स हटवा :

By admin | Updated: January 1, 2016 00:32 IST

महापौरांची आयुक्तांकडे मागणी

कोल्हापूर : शहरातील टोल रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला असला तरी टोलवसुलीसाठी ‘आयआरबी’मार्फत उभारलेल्या केबिन्स, बॅरिकेट्स ह्या वाहनधारकांना अडथळा ठरत आहेत. त्यामुळे हे अडथळे काढून टाकण्यात यावेत, अशी मागणी महापौर अश्विनी रामाणे यांनी आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे. कोल्हापूर शहरात एकात्मिक रस्ते विकास प्रकल्प अंतर्गत आयआरबी कंपनीने शहरातील रस्तेविकासाचे काम केलेले आहे. या कंपनीच्या कामाचा दर्जा तसेच नियोजनाप्रमाणे काम होत नसल्याने शहरात असंतोष निर्माण होऊन शहरवासीयांनी गेली पाच वर्षे आंदोलने केली. शहरवासीयांच्या आंदोलनांची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोल रद्दची घोषणा केली. कोल्हापूर शहर हे ऐतिहासिक असले तरी मुख्य व्यापारी पेठेचे केंद्र आहे. दक्षिण काशी व श्री अंबाबाईचे वास्तव्य, दख्खनचा राजा श्री जोतिबा, नृसिंहवाडी ही देवस्थाने तसेच येथे ऐतिहासिक असा पन्हाळा किल्ला आहे. त्यामुळे शहरात भाविक व पर्यटकांची गर्दी असते. सिंधुदुर्ग व रत्नागिरी या कोकणातील दोन जिल्ह्यांना जोडणारा हा महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांतील वाहतूक ही शहरातूनच होते. ‘आयआरबी’ कंपनीमार्फत टोलवसुलीसाठी उभारलेल्या केबिन्स, बॅरिकेटस्मुळे वाहनधारकांना वाहन चालविताना अडचणी होत आहेत. त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. वाहतूक सुरळीत, सुरक्षित व गतीने होण्यासाठी आयआरबी कंपनीने शहरात प्रवेश करणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर टोलवसुुलीसाठी उभ्या केलेल्या केबिन्स, बॅरिकेट्स काढणे आवश्यक आहे. त्याबद्दल तातडीने कारवाई करावी, अशी मागणी महापौर अश्विनी रामाणे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)टोल रद्द करण्याची घोषणा करण्यात आली असली तरी अद्याप अधिसूचना न निघाल्याने शहरवासीयांत संदिग्धता आहे. आयआरबी कंपनी न्यायालयात जाण्याची शक्यता असल्याची भीती कोल्हापूर शहरवासीयांच्या मनात जागा करीत आहे. त्यामुळे आयआरबी कंपनीने उभारलेल्या केबिन्स हटविणे महत्त्वाचे आहे.- अश्विनी रामाणे, महापौर