शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
3
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
4
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
5
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
6
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
7
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
8
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
11
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
12
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
13
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
14
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
15
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
16
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
17
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
18
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
19
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
20
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी

‘बिद्री’तुन लबाडांची टोळी हटवा : प्रकाश आबिटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 21:05 IST

पांगिरे : बिद्री साखर कारखाना हा चार तालुक्यातील शेतकºयांच्या कष्टातुन उभा राहिला आहे.

पांगिरे : बिद्री साखर कारखाना हा चार तालुक्यातील शेतकºयांच्या कष्टातुन उभा राहिला आहे. या कारखान्यावर दिनकरराव जाधव यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ असताना पारदर्शक कारभार झाला. मात्र गेल्या दहा वर्षात हसन मुश्रीफ, के.पी पाटील या हसन - किसन कंपनीने स्व:हित साधण्यासाठी कारखान्याची लुट केली आहे. ही लुटारुंची टोळी हटवा असे आवाहन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले. ते पांगिरे (ता.भुदरगड) येथे बिद्री कारखान्याच्या निवडणूक पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सरपंच राजाराम महादेव भराडे हे होते .आमदार आबिटकर म्हणाले, बँक आणि भु--विकास बँक बुडवणारे नेते आपल्यावर आरोप करीत आहेत. ज्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या संस्था मोडीत काढल्या, पै पाहुण्याना सभासद केले त्यांना भ्रष्टाचारावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. के.पी पाटील यांनी केवळ सहवीज प्रकल्पाचा डांगोरा पिटला आहे. सहवीज प्रकल्प झाल्यानंतर टनाला २००रुपये वाढीव दर मिळेल अशी खोटी स्वप्ने दाखवून शेतकºयांची दिशाभुल केली आहे .यावेळी माजी अध्यक्ष दिनकरराव जाधव ,माजी संचालक के.जी नांदेकर, राधानगरीचे विजयसिह मोरे ,काँग्रेस भुदरगड तालुका अध्यक्ष शामराव देसाई ,शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश पाटील,नंदकुमार सुर्यवंशी,माजी सभापती पांडुरंग पाटील ,गोकुळचे माजी संचालक दिनकर कांबळे , शिवसेना उपतालुका प्रमुख अशोक पाटील ,उपसरपंच सौ.वैशाली पाटील ,सौ.इंदुबाई भराडे,नामदेव गडकरी ,तानाजी घोटणे,मारूती भराडे,धोंडीराम पाटील ,पांडुरंग घोटणे,गोपाळ पाटील ,दत्तात्रय भाटले,सात्ताप्पा सुतार ,नागेश पाटील आदि उपस्थित होते .यावेळी प्रास्तविक तानाजी घोटणे यानी व आभार राजाराम भराडे यानी मानले.23 पांगिर सभा : पांगिरे( ता.भुदरगड)कार्यकर्त्यांचा मेळाव्यात आमदार प्रकाशराव आबिटकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शेजारी दिनकरराव जाधव,विजयसिह मोरे ,शामराव देसाई आदी उपस्थित होते.