शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

भाजप, महाडिक कुटुंबांची ताकद विरोधी लागल्याने पराभव

By admin | Updated: November 4, 2015 01:22 IST

मुश्रीफ : राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार

कोल्हापूर : राज्यात भाजपची सत्ता, दुसरीकडे महाडिक कुटुंबाची ताकद, आर्थिक पाठबळ विरोधात लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नसल्याची कबुली माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली. महापालिका निवडणुकीनंतर राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार मंगळवारी पक्षाच्या जिल्हा कार्यालयात झाला. याप्रसंगी मुश्रीफ बोलत होते.महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे १५ उमेदवार विजयी झाले आहेत. त्यांच्या सत्कारप्रसंगी मुश्रीफ म्हणाले, गेल्या पाच वर्षांत राष्ट्रवादीचे २५ नगरसेवक सत्तेत होते. राज्यातही सत्ता काँग्रेस-राष्ट्रवादीची होती. त्यामुळे महापालिकेसाठी अपेक्षित निधी आणण्यात यश आले. यंदाच्या निवडणुकीत प्रचारात राष्ट्रवादीने आघाडी घेतली होती. महापालिकेत सर्वांत मोठा पक्ष ठरेल, असे अपेक्षित होते; पण १५ जागा मिळाल्या, तर २१ उमेदवारांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. पक्षाच्या अनेक उमेदवारांचा पराभव हा अवघ्या ५० मतांनी झाला आहे. राज्यात एकीकडे भाजपची सत्ता तर दुसरीकडे आमदार महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक व आमदार अमल महाडिक यांची ताकद, आर्थिक पाठबळ हे राष्ट्रवादीच्या विरोधात उभारले होते. प्रशासकीय यंत्रणेनेही विरोधकांना साथ दिली तर दुसऱ्या बाजूला सतेज पाटील यांना विधानसभेतील पराभवाची सहानुभूती मिळाली. त्यातच प्रचारात सिंचन प्रकरण आणि केडीसीसी बँकेची चौकशी लावून राष्ट्रवादीला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे आम्हाला लक्ष्य गाठता आले नाही. राष्ट्रवादीची ध्येय-धोरणे, योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवून आम्ही पुढच्या निवडणुकीसाठी सज्ज होत आहेत. निवडून आलेल्या पक्षाच्या सर्व उमेदवारांना सन्मानाने पदे दिली जातील; तर पराभूतांनी खचून न जाता पक्षवाढीसाठी प्रयत्न करावेत. पक्ष, संघटनेत पदांबाबत त्यांचा निश्चितच विचार करू, असेही ते म्हणाले. शहराध्यक्ष राजेंद्र लाटकर यांनी प्रास्ताविक केले. राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे यांनी स्वागत केले. यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य आर. के. पोवार, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, आदिल फरास यांचीही भाषणे झाली. यावेळी प्रा. जयंत पाटील व नवनिर्र्वाचित १५ नगरसेवक, पराभूत उमेदवारही उपस्थित होते. (प्रतिनिधी)