शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी आरक्षणात मराठा समाजाच्या अतिक्रमणाचा डाव हाणून पाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:23 IST

कोल्हापूर : घटनेने ओबीसी समाजाला दिलेल्या ५२ टक्के आरक्षणात मराठा, जाट यांच्यासारखा क्षत्रिय, जमीनदार समाजाचा शिरकाव करण्याचा डाव देशभर ...

कोल्हापूर : घटनेने ओबीसी समाजाला दिलेल्या ५२ टक्के आरक्षणात मराठा, जाट यांच्यासारखा क्षत्रिय, जमीनदार समाजाचा शिरकाव करण्याचा डाव देशभर सुरू आहे. तो खऱ्या ओबीसींनी संघटितपणे हाणून पाडावा, असे आवाहन श्रमिक ओबीसी महासंघाचे श्रावण देवरे यांनी केला. मराठा आरक्षणाला विरोध नाही, द्यायचेच आहे तर ईडब्लूएसची आरक्षण मर्यादा १० वरून २५ टक्केपर्यंत वाढवावी आणि खुशाल द्यावे, असेही त्यांनी सांगितले.

कोल्हापुरात शनिवारी श्रमिक ओबीसी महासंघातर्फे शाहू स्मारकामध्ये पहिली ओबीसी सक्षमीकरण परिषद झाली. ओबीसी समाजाच्या स्वतंत्र जनगणनेसह सहकारी संस्थातील प्रतिनिधीत्व व नोकऱ्यांमध्ये आरक्षणाच्या मागणीचे १८ ठराव एकमताने मंजूर झाले.

परिषदेचे अध्यक्ष म्हणून नाशिकचे श्रावण देवरे म्हणाले, ओबीसी समाज कायम दुर्बलच रहावा, असे जाणीवपूर्वक प्रयत्न होताना दिसत आहेत. मराठा, जाट हा बलवान समाज आहे. ते ओबीसीमध्ये आले तर खरे ओबीसी आपोआपच मागे पडणार आहेत. देशातील ५२ टक्के असणाऱ्या या बहुजन समाजाच्या दृष्टीने हे घातक असल्यानेच आता ओबीसी समाजाने हक्कासाठी अधिक जागरूक राहिले पाहिजे. एसईबीसी म्हणजेच ओबीसी आहे, फक्त शब्दांचा छल करून ओबीसींना फसवले जात असल्याचेही देवरे यांनी सांगितले.

स्वागताध्यक्ष म्हणून बोलताना डॉ. आनंद गुरव यांनी आरक्षणामुळे का असेना गावात ओबीसी पद, मान मिळत आहे. पण उच्च समाजातील लोक अजूनही पद देऊन उपकार केल्याची भाषा वापरत असल्याचे चित्र असल्याचे सांगत ओबीसींनी स्वाभिमानाने आणि अभिमानाने लोकशाहीने दिलेल्या हक्काचा वापर करावा असे सांगितले.

परिषदेतील प्रमुख ठराव

ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी

ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावे

मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ओबीसीतून नको

धनगर समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या, विणकरांना ओबीसीत घ्या

सहकारी नोकरी व संस्थांमध्ये ओबीसी प्रतिनिधी घ्या

बढतीतील आरक्षण व नोकऱ्यांमध्ये आरक्षण लागू करा

बँकांना सवलतीच्या दरात कर्जपुरवठा करण्यास सांगा

फोटो : १३०२२०२१-कोल-ओबीसी

फोटो ओळ : कोल्हापुरात शनिवारी शाहू स्मारकमध्ये पहिली ओबीसी सक्षमीकरण परिषद झाली. परिषदेचे अध्यक्ष म्हणून श्रावण देवरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अतुल दिघे, धनाजी गुरव, संदीप संकपाळ, दिगंबर लोहार, धाेंडीबा कुंभार, दिलीप लोखंडे, नारायण मिरजकर यांची प्रमुख उपस्थिती होती.