शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

आदेश पाहून दोषारोप निश्चिती:: गोविंद पानसरे हत्या प्रकरण

By admin | Updated: April 30, 2016 00:41 IST

जिल्हा व सत्र न्यायालयाची माहिती : सुनावणी तहकूब; ४ मे रोजी होणार निर्णय

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याच्या विरोधात दोषारोप पत्र निश्चित करण्याचे सर्वाधिकार सत्र न्यायालयास आहेत, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या आदेशाची प्रत पाहून दि. ४ मे रोजीच्या सुनावणीमध्ये दोषारोप केव्हा निश्चित करायचे यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, तोपर्यंत सुनावणी तहकूब ठेवण्याचा निर्णय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी शुक्रवारी घेतला. संशयित गायकवाडला कारागृहातून सशस्त्र पोलिस बंदोबस्तात न्यायालयात आणले होते. पानसरे खटल्यातील आरोपी समीर गायकवाड याच्याविरोधात दोषारोप पत्र निश्चित करण्यासाठी शुक्रवारी दुपारी जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश बिले यांच्या दालनात सुनावणी झाली. यावेळी ज्येष्ठ विशेष सरकारी वकील हर्षल निंबाळकर यांनी दि. २७ एप्रिलला उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीमध्ये समीर गायकवाडच्या विरोधात दोषारोप पत्र निश्चित करायचे की नाही, याचे सर्वाधिकार सत्र न्यायालयास आहेत. आम्ही या खटल्यामध्ये हस्तक्षेप करत नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे दोषारोपासंदर्भात तुम्ही निर्णय घ्यावा; परंतु आमची विनंती राहील की, पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर व डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येचा तपास उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार सीबीआय, एसआयटी व सीआयडी (कर्नाटक) यांच्यात समन्वयाने सुरू आहे. न्यायालयाने या तपास यंत्रणेला दि. ३ मेपर्यंत पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. समीर गायकवाड याच्या जामीन अर्जावर दि. ६ मे रोजी सुनावणी आहे. त्यामुळे या दोन्ही सुनावणीनंतर दि. ११ मे रोजी दोषारोप निश्चित करण्यासाठी सुनावणी ठेवावी, अशी विनंती केली. त्यावर समीरचे वकील समीर पटवर्धन यांनी माझी कोणतीच हरकत नसल्याचे सांगितले. न्यायाधीश बिले यांनी उच्च न्यायालयाने दोषारोप निश्चित करण्यासाठी स्थगिती दिलेली नाही. त्यांनी दिलेल्या सूचनांची आॅर्डर अद्याप मला मिळालेली नाही. ती आॅनलाईन दोन दिवसांत मिळेल. आॅर्डर पाहून दि. ४ मे च्या सुनावणीमध्ये दोषारोप केहा निश्चित करायचे यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत ही सुनावणी तहकूब करू, असे सांगितले. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक एस. चैतन्या, पोलिस निरीक्षक अमृत देशमुख, मेघा पानसरे, कॉ. दिलीप पवार, अ‍ॅड. चंद्रकांत बुधले आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) फिरण्यास बंदी घातल्याची समीरची तक्रार समीर गायकवाड हा कळंबा मध्यवर्ती कारागृहात अंडासेलमध्ये बंदिस्त आहे. त्याला सत्र न्यायालयाने दुपारी १२ ते ३ या वेळेत अंडासेलच्या बाहेर फिरण्यास मुभा दिली होती; परंतु कारागृह प्रशासनाने दि. २५ एप्रिलपासून त्याला बाहेर सोडण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे मी कोणाशी बोलू शकत नसल्याने वेडा होईल, मला पहिल्यासारखी मोकळीक द्यावी, अशी विनंती समीरने न्यायाधीश बिले यांच्याकडे केली. त्यांनी यासंदर्भात कारागृह प्रशासनाला सूचना केल्या जातील, असे सांगितले. कोल्हापुरातील कळंबा कारागृहातून शुक्रवारी समीर गायकवाडला न्यायालयात घेऊन जाताना पोलिस.