शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरसह जिल्ह्यात मृग बरसला

By admin | Updated: June 20, 2014 01:08 IST

बळीराजा सुखावला : पावसाची दमदार सुरूवात; दिवसभर ढगाळ वातावरण

कोल्हापूर : शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात आज, गुरुवारी पावसाने दमदार हजेरी लावली. राज्यात सर्वत्र गेल्या काही दिवसांपासून मान्सून सक्रिय झाला असला, तरी जिल्ह्यात मात्र पावसाने काहीशी ओढ दिली होती; परंतु आज सकाळपासून पावसाने हजेरी लावल्याने विशेषत: शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. आजच्या पावसाने शहरवासीयांना सुखद गारव्याचा आनंद मिळाला. मृग नक्षत्राला ८ जूनला सुरुवात झाली; परंतु या नक्षत्राने ओढ दिल्याने वेळेवर पेरण्या पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात चिंतेचे वातावरण होते. हे नक्षत्र कोरडे जाते की काय, असे वाटत असतानाच शेवटच्या चरणात आज सकाळपासून पावसाला दमदार सुरुवात झाली. दुपारनंतर तर एकसारखा पाऊस सुरू झाला. पावसाला म्हणावा तितका जोर नसला, तरी त्यात सातत्य होते. त्यामुळे शहरवासीयांना आज आपली छत्री, रेनकोट, टोपी बाहेर काढावी लागली. सकाळी घरातून बाहेर पडताना पावसापासून बचाव करणारे कपडे सोबत न घेतलेल्या शहरवासीयांनी मात्र आज पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद घेतला. (प्रतिनिधी)