शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

‘दीपोत्सव’ सृजनशील पत्रकारितेचा आदर्श

By admin | Updated: November 6, 2015 00:32 IST

मान्यवरांनी व्यक्त केल्या भावना : ‘लोकमत’च्या दिवाळी अंकाचे शानदार प्रकाशन

कोल्हापूर : वाचक घडविणारी व संस्कार करणारी साप्ताहिके, मासिके आता संपली आहेत; पण जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत भाषा मरत नसते. लेखक देतील तो मजकूर छापण्याऐवजी एखादी संकल्पना घेऊन निघणारा ‘लोकमत’चा ‘दीपोत्सव’ हा अंक सृजनशील, संशोधनात्मक आणि पत्रकारितेतला उत्तम आदर्श निर्माण करणारा आहे, असे मत लेखक कृष्णात खोत यांनी व्यक्त केले. ‘लोकमत’च्या ‘दीपोत्सव’ दिवाळी अंकाचे प्रकाशन गुरुवारी ‘लोकमत’च्या शहर कार्यालयात झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिव शुभांगी गावडे, गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालयाच्या प्रशासन अधिकारी मंजिरी देसाई, नूतन नगरसेविका उमा इंगळे, ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले, सहाय्यक सरव्यवस्थापक (वितरण) संजय पाटील उपस्थित होते. खोत म्हणाले, दिवाळी अंकाला मोठी परंपरा आहे. मी स्वत: दिवाळी अंकात लेखन करून पुढे आलो; पण कालौघात भाषा कधी नष्ट झाली नाही. ती नवी येते, जुनी असते, आजच्या परिस्थितीत वाचनसंस्कृतीची बिकट वाट सुरू आहे. त्याला उत्तर देण्याचे सामर्थ्य ‘लोकमत’च्या ‘दीपोत्सव’मध्ये आहे. खेड्यात अजूनही दिवाळी अंक, विविध साप्ताहिके, मासिके वाचली जातात. त्यांची भूक भागविली गेली पाहिजे. त्यासाठी वाचन कार्यशाळा घेतली गेली पाहिजे. कारण वाचनसंस्कृती वाढली तरच आपल्या जगण्याला नवा अर्थ आहे. शुभांगी गावडे म्हणाल्या, ‘लोकमत’चे अंक आम्ही महाविद्यालयात संदर्भासाठी जपून ठेवतो. सध्या ई-माध्यमे, गॅझेटसचा जमाना आहे. त्यामुळे तरुणपिढी सामाजिक भान विसरत चालली आहे. आपली चौकस बुद्धी गंजत चालली आहे. अशा परिस्थितीत हा दिवाळी अंक नवीन वाचकांना आणि चांगल्या लेखकांना जोडणारा दुवा ठरला आहे. मंजिरी देसाई यांनीही ‘दीपोत्सव’ला शुभेच्छा देत हा अंक महाविद्यालयात विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगितले. प्रास्ताविकात संपादक वसंत भोसले म्हणाले, देशात दिवाळी अंकाची मोठी परंपरा आहे. त्यात ‘लोकमत’चा दिवाळी अंक अग्रेसर आहे. आवृत्तीनिहाय दिवाळी अंकासोबतच महाराष्ट्र, देश आणि परदेशातील मराठी वाचकांना एकत्र आणणारा ‘दीपोत्सव’ हा अंक प्रसिद्ध केला जातो. गतवर्षी अंकाच्या १ लाख १ हजार १६७ प्रतींची विक्री झाली असून तो दिवाळी अंकांच्या इतिहासातला विक्रमच ठरला आहे. यंदा दीड लाख अंकांची मागणी आली आहे. ‘जिथे मराठी तिथे लोकमत’ असे ‘लोकमत’चे ब्रीद असून हा दीपोत्सव अंक दर्जेदार निघण्यासाठी वर्षभर काम चालते. नूतन नगरसेविका उमा इंगळे यांनीही दीपोत्सव अंकाला शुभेच्छा दिल्या. सखी मंच संयोजिका प्रिया दंडगे यांनी सूत्रसंचालन केले. वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांनी मान्यवरांचे आभार मानले.