शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लज पंचायत समितीला दीनदयाळ उपाध्याय पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:25 IST

केंद्राच्या ग्रामीण मंत्रालयाकडून राज्यातील दोन पंचायत समित्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यामध्ये गडहिंग्लज पंचायत समितीचा समावेश असून अहमदनगर ...

केंद्राच्या ग्रामीण मंत्रालयाकडून राज्यातील दोन पंचायत समित्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यामध्ये गडहिंग्लज पंचायत समितीचा समावेश असून अहमदनगर जिल्ह्यातील 'राहाता' पंचायत समितीलाही हा पुरस्कार मिळाला आहे. केंद्र शासनाकडून २५ लाखांचे बक्षीस व सन्मानपत्र देण्यात येणार आहे.

राज्यस्तरावरील कोकण विभागीय कमिटीतर्फे गडहिंग्लज पंचायत समितीच्या कामांची पाहणी करण्यात आली. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी, रोजगार हमी योजना, समाजकल्याण, स्वच्छता अभियान, आरोग्य विभागाकडील योजना, राष्ट्रीय पेयजल, आदींसह सर्व विभागांकडील राबविलेल्या योजनांची पाहणी करून मूल्यांकन करण्यात आले.

यापूर्वी गडहिंग्लज पंचायत समितीने राज्यस्तरावरील 'यशवंत पंचायत राज' पुरस्कार मिळवून राज्याला आदर्श देणारे काम केले आहे. केंद्राकडून मिळालेल्या या पुरस्कारामुळे पंचायत समितीच्या यशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

या कामी सभापती रूपाली कांबळे, उपसभापती इराप्पा हसुरी यांच्यासह सदस्य, गटविकास अधिकारी शरद मगर, खातेप्रमुख व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

--

मंत्रिमहोदयांचे सहकार्य, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व सदस्यांच्या सक्रिय सहभागामुळे शासनाच्या योजनांची अंमलबजावणी सहजपणे करता आली. आपण केलेल्या कामांचे सादरीकरण उत्तमरीत्या करता आले. सर्वांच्या सहभागातून हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

- शरद मगर, गटविकास अधिकारी, गडहिंग्लज पंचायत समिती.

---------------------------------

* गडहिंग्लज पंचायत समिती : ०१०४२०२१-गड-०९