पट्टणकोडोली येथील पाचगाव पाणंदची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. शेतकऱ्यांना शेतीकडे येणे-जाणे मुश्कील बनले होते. यावेळी काही शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला होता. आंदोलनस्थळाला माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी भेट देऊन त्यांच्या फंडातून १९ लाख रुपये मंजूर केले होते. या पाचगाव पाणंद रस्त्याचा लोकार्पण सोहळा आमदार सदाभाऊ खोत यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी या रस्त्यासह गावातील दुरवस्था झालेल्या विजयी मैदानासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आमदार सदाभाऊ खोत यांनी दिले. याप्रसंगी सरपंच विजया जाधव, रयत क्रांतीचे तालुकाध्यक्ष गुंडुराव मोरे, पंचायत समिती सदस्य अरुण माळी, प्रभावती पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख सत्ताप्पा भवान, धुळा देवरे, रावसो विठांना, दत्ता अवाडे, बापूसाहेब सूर्यवंशी, सतीश नाईक, सुधीर सूर्यवंशी, निखिल पाटील, सूरज माळी, समीर जमादार, कल्लाप्पा शिरोळे व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाचगाव पाणंद रस्त्याचा लोकार्पण सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:22 IST