शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकी प्रवेशाच्या संधी घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 01:01 IST

संतोष मिठारी । कोल्हापूर : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांच्या पदवी प्रवेशाचा कोटा १० टक्क्यांवर ...

ठळक मुद्देपदविकाधारकांचा कोटा घटविल्याचा परिणाम : निर्णय विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक

संतोष मिठारी ।कोल्हापूर : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांच्या पदवी प्रवेशाचा कोटा १० टक्क्यांवर आणण्याचा निर्णय अन्यायकारक आहे. त्यामुळे या प्रवेशाच्या संधी कमी होणार आहेत. या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी तंत्रनिकेतनमधील शिक्षक, विद्यार्थ्यांकडून होत आहे.

देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांतील प्रवेशासाठी जागा रिक्त असल्याच्या कारणावरून ‘एआयसीटीई’ने अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमानंतर पदवी अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षाच्या प्रवेशाकरिता सध्या असणारा २० टक्के जागांचा कोटा आता १० टक्क्यांवर आणला आहे. एका अभियंत्याबरोबर (इंजिनिअर) सात पदविकाधारक आणि त्यांच्यानंतर १९ कामगार असे साधारणत: प्रमाण आहे. मात्र, सध्या हे प्रमाण बिघडले आहे.

अभियांत्रिकी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या तुलनेत पदविकाधारकांचे प्रमाण कमी आहे. पदविका अभ्यासक्रमानंतर बहुतांश विद्यार्थी अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी प्रवेशित होतात. तीन वर्षांची पदविका पूर्ण केल्यानंतर पदवीसाठी थेट द्वितीय वर्षाला प्रवेश मिळत असल्याने, पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणे सोईस्कर व्हावे, या उद्देशाने दहावीनंतर विद्यार्थी पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतात. पदविका अभ्यासक्रमानंतर पदवीसाठी प्रवेशित होताना प्रवेश परीक्षा द्यावी लागत नसल्याने अनेक विद्यार्थी दहावीनंतरचा पदविका करण्यास प्राधान्य देतात.आधी निर्णय व्हावापदविका अभ्यासक्रमांचे ९० टक्के विद्यार्थी पदवीसाठी प्रवेशित होतात. त्यांच्यासाठी हा निर्णय अन्यायकारक असल्याचे अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रतापसिंह देसाई यांनी सांगितले. ते म्हणाले, कोटा कमी करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी तीन वर्षे आधी निर्णय जाहीर करणे आवश्यक होते.

आकडेवारी दृष्टिक्षेपातमहाराष्ट्रातील तंत्रनिकेतन महाविद्यालयांची संख्या : ४५०प्रथम वर्षासाठी प्रवेश घेणारेविद्यार्थी : सुमारे दीड लाखशिक्षण घेणारे एकूण विद्यार्थी : सुमारे साडेचार लाखकोल्हापुरातील तंत्रनिकेतनचीसंख्या : २३विद्यार्थ्यांची संख्या : १४,०००

 

पदविका प्रवेशाच्या जागा घटविण्याच्या निर्णयामुळे पदवी प्रवेशासाठी चांगल्या महाविद्यालयातील प्रवेशाच्या संधी कमी होणार आहेत.- डॉ. महादेव नरके, प्राचार्य,डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक.

दहावीनंतर व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी शासन आणि व्यावसायिक संस्थांद्वारे राबविण्यात येत असलेली मोहीम पाहता, ‘एआयसीटीई’चा सदरचा निर्णय विद्यार्थी, पदविका संस्थाचालकांच्या दृष्टीने निराशाजनक आहे.- दिग्विजय पवार, प्राचार्य,वाय. डी. माने इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी, कागल.

आकडेवारी दृष्टिक्षेपातमहाराष्ट्रातील तंत्रनिकेतन महाविद्यालयांची संख्या : ४५०प्रथम वर्षासाठी प्रवेश घेणारेविद्यार्थी : सुमारे दीड लाखशिक्षण घेणारे एकूण विद्यार्थी : सुमारे साडेचार लाखकोल्हापुरातील तंत्रनिकेतनचीसंख्या : २३विद्यार्थ्यांची संख्या : १४,०००