शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

युती तुटल्याने भाजपाच्या अडचणी वाढल्या

By admin | Updated: January 27, 2017 18:37 IST

शिवसेनेचे भाजपशी पुरते बिनसले आहे, तर ‘स्वाभिमानी’चे राजू शेट्टी हे त्याच वाटेवर आहेत.अशी माहिती समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमतकोल्हापूर : शिवसेनेचे भाजपशी पुरते बिनसले आहे, तर ‘स्वाभिमानी’चे राजू शेट्टी हे त्याच वाटेवर आहेत. त्यांनी फक्त अजून घोषणा केलेली नाही; परंतु भाजपा आघाडी (भाजपा, जनसुराज्य आणि महाडिक यांची ताराराणी आघाडी) आणि दोन्ही काँग्रेस आघाडी प्रत्येकी २५ अशा ५० जागांवर थांबली आणि त्यातही शिवसेना व ‘स्वाभिमानी’ला मानणारे असे १५ ते २० सदस्य निवडून आले तर सत्ता नेमकी कुणाच्या हातात द्यायची याचा निर्णय शिवसेना आणि स्वाभिमानीच्या हातात असू शकेल. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत सत्तेपर्यंत जाण्याच्या भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत. 

भाजपा व शिवसेना हे पक्ष राज्यात सत्तेत असले तरी त्यांचे जिल्ह्याच्या राजकारणात कधी सख्य नव्हतेच. त्यात महापालिकेच्या निवडणुकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला बाजू सारुन माजी आमदार महादेव महाडिक यांना काखेत घेतल्यामुळे या दोन मित्रपक्षांतला दुरावा वाढला होता. नगरपालिकेच्या निवडणुकीतही तोच कित्ता पुढे सुरु राहिला. आताही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांची युती होण्याची चिन्हे नव्हतीच. कारण शिवसेनेशी कोणतीही चर्चा होण्यापूर्वीच पालकमंत्री पाटील यांनी गेल्या रविवारीच भाजपा आघाडीचे जागा वाटप जाहीर केले.

त्यावर शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी जोरदार टीका केली होती. आम्हांला जागा देणारे दादा कोण अशी रोखठोख विचारणा त्यांनी केली होती. परंतु तरीही मुंबई महापालिकेत काय होते. याकडे दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे लक्ष होते. तिथेही शिवसेनेने स्वत:हूनच स्वबळावर लढण्याचे गुरुवारी जाहीर केले. परिणामी जिल्ह्याच्या राजकारणातही या दोन पक्षांच्या वाटा वेगळ्या झाल्या.

अशीच काहीशी स्थिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचीही आहे. त्यांनीही भाजपापासून बाजूला जाऊन काही ठिकाणी काँग्रेसशी हातमिळवणी करून तर शिरोळमध्ये स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे. स्वाभिमानी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यात संघर्षाची वात लावण्याचे काम भाजपा करत असल्याचा शेट्टी यांचा आरोप आहे. त्याशिवाय महाडिक व जनसुराज्य शक्तीचे नेते विनय कोरे यांना पायघड्या घालणारे भाजपावाले स्वाभिमानी संघटनेशी साधी चर्चाही करायला तयार नाहीत असे त्यांचे म्हणणे आहे.

त्यामुळे संघटनेनेही आता काही करुन भाजपाला जिल्हा परिषदेच्या सत्तेपासून रोखण्यासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.मावळत्या जिल्हा परिषदेत ६९ पैकी सहा सदस्य शिवसेनेचे होते. आता परिस्थिती बदलली आहे. या सहा आमदारांच्या कार्यक्षेत्राबरोबरच काँग्रेसमधून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजय मंडलिक शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्यांचा कागलमध्ये स्वतंत्र गट आहे. राष्ट्रवादीचे दिवंगत नेते बाबा कुपेकर यांचे पुतणे संग्राम शिवसेनेत आहेत. दोन्ही काँग्रेसच्या अंतर्गत राजकीय कुरघोड्यांमध्ये ज्या आमदारांचे साधले होते त्यांची आता खरी ताकद या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने दिसणार आहे.