कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी गेल्या १४ दिवसांतील मृतांचा आकडा मंगळवारी पहिल्यांदा कमी आला. संध्याकाळी संपलेल्या २४ तासांत ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी तिघे इतर जिल्ह्यातील आहेत. ९६१ जणांनी कोरोनावर मात केली असून उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १३ हजार ८६२ वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात रविवारपासून कडक लॉकडाऊनची सुरुवात झाली असून येत्या आठ दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या घटेल असा विश्वास प्रशासनाला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांतील कोरोना मृतांचा आकडा भीतीदायक होता. या पार्श्वभूमीवर १४ दिवसांनंतर मृतांचा आकडा ३५ वर आल्यामुळे थोडा दिलासा मिळाला.
गेल्या २४ तासांत सर्वाधिक ३२५ कोरोनाचे रुग्ण कोल्हापूर शहरामध्ये नोंदवण्यात आले असून करवीर तालुक्यात १९१, हातकणंगले तालुक्यात १७४ तर राधानगरी तालुक्यात १०५ रुग्ण आढळले आहेत. राधानगरी तालुक्यातील रुग्णवाढ कशामुळे झाली याचा शोध घेण्याची गरज आहे. इचलकरंजीमध्ये १०९ तर अन्य जिल्ह्यातील ७६ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
चौकट
सर्वाधिक मृत्यू हातकणंगलेत
हातकणंगले ०६
नागोबावाडी वडगाव, हातकणंगले, माळवाडी माणगाव, पुलाची शिरोली, खोची, पेठ वडगाव.
इचलकरंजी ०५
जाधव मळा, सांगली नाका, उत्तम प्रकाश टॉकीज, लालनगर, गणेशनगर.
कोल्हापूर ०५
न्यू वाशीनगर, जागृतीनगर, आर. के. नगर ०३
आजरा ०३
किणे, बहिरेवाडी, लाकूडवाडी.
करवीर ०३
म्हारूळ, नागदेववाडी, सांगरूळ
भुदरगड ०२
वाघापूर, गारगोटी
चंदगड ०२
चंदगड, बेलेभाट
शिरोळ ०२
जयसिंगपूर, यड्राव
पन्हाळा ०२
पैजारवाडी, कळे
राधानगरी ०१
कासारवाडा
शाहूवाडी ०१
उदगिरी
इतर ०३
झुंजारवाडी अथणी, मालगाव मिरज, मंगसुळी अथणी